Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi फेम स्नेहा वाघ म्हणते पावसा पावसा लवकर ये, का तर म्हणे मला तुझ्यासोबत...

Bigg Boss Marathi फेम स्नेहा वाघ म्हणते पावसा पावसा लवकर ये, का तर म्हणे मला तुझ्यासोबत...

जून महिना सुरू झाला आहे. शेतकरी राजाला पावासाचे वेध लागले आहेत. त्याप्रमाणे अभिनेत्री स्नेहा वाघला देखील पावसाचे वेध लागले आहेत. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  मुंबई, 6 जून- बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi 3) घरातील सारंगी गर्ल स्नेहा वाघ (Sneha Wagh) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या ग्लॅम फोटोंनी असेल किंवा इन्स्टा रील्सने नेहमीच ती चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती नवीन कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिचा मोठा चाहता वर्ग आहे. स्नेहानं नुकतेच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंसोबत तिनं एक इंग्रजी कविता देखील शेअर केली आहे. यावरून तर ती पावासाची वाट पाहात असल्याचे दिसत आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. जून महिना सुरू झाला आहे. शेतकरी राजाला पावासाचे वेध लागले आहेत. त्याप्रमाणे अभिनेत्री स्नेहा वाघला देखील पावसाचे वेध लागले आहेत. नुकतेच तिनं तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तर असेच दिसत आहे की, स्नेहाला पावसाचे वेध लागले आहेत. शिवाय तिनं तिच्या फोटोला कॅप्शन देखील तशीच दिली आहे. तिनं म्हटलं आहे की,''rain, rain, come soon. Play with me in the afternoon. Cry not if you are hungry. I'll feed you with my silver spoon.☁️️'' या ओळींचा अर्थ असाच होतो की, पावसा पावसा लवकर ये..मला तुझ्यासोबत खेळायचं आहे....स्नेहाला देखील पावसात खेळायचा मोह झाल्याचे दिसत आहे. उन्हाळा वाढल्याने अनेक जण पाऊस लवकर यावा अशी प्रार्थना करत आहेत. त्यात मुंबईकरांचा तर विषय सोडा. गर्मीमुळे मुंबईकरत त्रस्त झाले आहेत. यासाठी जून महिना लागला रे लागला की, सगळ्यांना पावसाळ्याचे वेध लागतात. वाचा-तीन..तीन..तीन..म्हणत संकर्ष कऱ्हाडेने 3 फोटो केले शेअर,नेमकी पोस्ट कशाबद्दल? अभिनेत्री स्नेहा वाघने अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. ती हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधली (TV Industry) प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) आहे. स्नेहाचा जन्म मुंबईत कल्याण येथे झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या 13 व्या वर्षापासून तिने मराठी नाटकांमध्ये काम करणं सुरू केलं. 'अधुरी एक कहाणी' या मराठी मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. त्यानंतर तिने हिंदी सिनेसृष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. इमॅजिन टीव्हीवरच्या 'ज्योती' या शोमुळे स्नेहा प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत होती. त्यानंतर 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत तिनं 'मूरा' हे पात्र साकारलं. त्यानंतर `वीरा` या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली.
  View this post on Instagram

  A post shared by SSneha Wagh (@snehawagh)

  वयाच्या 19व्या वर्षी अभिनेता आविष्कार दारव्हेकरसोबत तिचा विवाह झाला; मात्र या नात्यात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं, असं बोललं जातं. त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट (Divorce)घेतला. 2015 मध्ये स्नेहानं इंटीरिअर डिझायनर अनुराग सोळंकीसोबत दुसरं लग्न केलं; मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर 8 महिन्यांतच ती त्याच्यापासून वेगळी झाली. अनुराग आणि स्नेहाचा अद्याप अधिकृत घटस्फोट झालेला नसला तरी तो लवकरच होईल, असं स्नेहाचं म्हणणं आहे. दोन लग्नं असफल ठरल्यानंतर स्नेहा तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेल्या फैजलसोबत डेट करत असल्याची जोरदार होती. मात्र ही अफवा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात देखील तिंच नाव जय दुधाणे याच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र यानंतर हे दोघे परत कधीच एकत्र दिसले नाहीत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या