Home /News /entertainment /

15 वर्षानंतर स्नेहा वाघनं 'या' खास व्यक्तीसोबत केला मुंबई लोकलनं प्रवास, फोटो पोस्ट करत म्हणाली...

15 वर्षानंतर स्नेहा वाघनं 'या' खास व्यक्तीसोबत केला मुंबई लोकलनं प्रवास, फोटो पोस्ट करत म्हणाली...

स्नेहा वाघनं 15 वर्षानंतर लोकलनं प्रवास केला. यावेळी तिनं तिचा चेहऱ्यावर मास्क घातला होता व शिवाय डोक्यावर टोपी देखील घातली होती.त्यामुळे स्नेहाला ओळखता येत नव्हते.

    मुंबई, 9 जून- बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi 3) घरातील सारंगी गर्ल स्नेहा वाघ (Sneha Wagh) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या ग्लॅम फोटोंनी असेल किंवा इन्स्टा रील्सने नेहमीच ती चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती नवीन कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिचा मोठा चाहता वर्ग आहे. स्नेहानं नुकताच मुंबई लोकलनं (local train )  प्रवास केला. यावेळी तिच्यासोबत तिची बहीण देखील होती. स्नेहा वाघनं 15 वर्षानंतर लोकलनं प्रवास केला. यावेळी तिनं तिचा चेहऱ्यावर मास्क घातला होता व शिवाय डोक्यावर टोपी देखील घातली होती.त्यामुळे स्नेहाला ओळखता येत नव्हते. तिच्या इन्स्टा स्टोरीला याचा फोटो पोस्ट केला आहे. जेव्हा तुम्ही एकदा मोठा चेहरा असता तेव्हा असं गर्दीत जाणं अवघड असते. शिवाय एकाद्या लोकप्रिय कलाकाराने आरामदायी प्रवास सोडून असा लोकलनं प्रवास करणे त्यांच्या चाहत्यांसाठी देखील आनंदाची गोष्ट असते. वाचा-अचानक असं काय झालं ज्यामुळं प्राजक्ताला हिमाचल प्रदेशमधून पळून यावं असं वाटतंय.. स्नेहानं तिच्या लोकल ट्रेनचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, माझे बाबा मध्य रेल्वेत होते त्यामुळे मी बालपणापासून ट्रेनमधून प्रवास केला आहे. पण आता 15 वर्षांनंतर मला माझे जुने दिवस आठवले.. खरं तर मी माझ्या वडिलांना आता मिस करत असल्याचे देखील तिनं म्हटलं आहे. स्नेहाने तिची बहीण कृतिकासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. तिच्या बहिणीने तिला एसी ट्रेनने प्रवास करण्याचे वचन दिले होते पण तिने नॉन-एसी ट्रेनने प्रवास केल्याचे देखील तिनं म्हटलं आहे.स्नेहाने म्हटलं आहे की, "ही मुलगी कृतिका वाघ. तिने मला एसी ट्रेनचे वचन दिले आणि मला एका सामान्य लोकल ट्रेनमध्ये नेले"..असं जरी असलं तरी तिनं लोकलच्या प्रवासाचा आनंद घेतल्याचे दिसत आहे. वाचा-'..म्हणून मी हे यश मिळवू शकले' अपूर्वानं सांगितला रात्रीसं खेळचा 'तो' अनुभव अभिनेत्री स्नेहा वाघने अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. ती हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधली (TV Industry) प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) आहे. स्नेहाचा जन्म मुंबईत कल्याण येथे झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या 13 व्या वर्षापासून तिने मराठी नाटकांमध्ये काम करणं सुरू केलं. 'अधुरी एक कहाणी' या मराठी मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. त्यानंतर तिने हिंदी सिनेसृष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. इमॅजिन टीव्हीवरच्या 'ज्योती' या शोमुळे स्नेहा प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत होती. त्यानंतर 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत तिनं 'मूरा' हे पात्र साकारलं. त्यानंतर `वीरा` या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या