मुंबई,7 डिसेंबर - 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) मध्ये सध्या धमाकेदार ट्विस्ट आला आहे. त्यामुळे चाहते चांगलेच एक्सयटेड झाले आहेत. घरातील लोकप्रिय माजी स्पर्धक स्नेहा वाघने (Sneha Wagh) घरात वापसी करत बिग धमाका केला आहे. दरम्यान स्नेहाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती अप्सरा भासत आहे.
स्नेहाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ (Instagram Video) शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्नेहा पिवळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये चालत येताना दिसत आहे. यामध्ये ती फारच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. तसेच व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'अप्सरा आली..' हे नटरंगमधील सोनाली कुलकर्णीचं लोकप्रिय गाणं वाजत आहे. तसेच व्हिडीओला कॅप्शन देत 'बिग बॉसच्या घरात पुन्हा आली ही अप्सरा' असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. तर काहींना असाही प्रश्न पडला आहे. की स्नेहा घरात असून तिचे बाहेरचे व्हिडीओ कसे बनवले जातात. कारण री हाच ड्रेस एपिसोडमध्ये दिसते.
नुकताच बिग बॉसच्या घरात एक चकित करणारं सरप्राईज चाहत्यांना मिळालं आहे. कारण आऊट झालेलं काही सदस्य घरात परत आले आहेत. यामध्ये स्नेहा वाघ, तृप्ती देसाई, स्नेहा वाघ यांचा समावेश आहे. स्नेहानेघरात प्रवेश करताच सर्वांवर बॉम्ब टाकला आहे. यामध्ये तिचा पूर्णपणे बदललेला अंदाज दिसून येत आहे. घरामध्ये एंट्री घेताच स्नेहाने जयवर निशाणा साधला. स्नेहा जयला खडेबोल सुनावत अशी म्हणाली की, 'या घरात सुरुवातीपासूनच जो कोणी माझ्याशी गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं.' या घरात पहिल्या दिवसापासून जयने माझा फक्त आणि फक्त वापरच करून घेतला आहे. त्यांनतर जय देखील एका सुटकेसवर जोरदार हात आपटताना दिसला. त्यांनतर त्याच्या हाताला थोडी दुखापत झाली होती. त्यामुळे तिला ड्रेसिंगसाठी मेडिकल रूममध्ये बोलावण्यात आलं होतं.
View this post on Instagram
त्यांनतर सर्वजण जयची विचारपूस करण्यासाठी बाथरूम एरियामध्ये आले होते. तसेच स्नेहासुद्धा तेथे आली. मात्र त्यावेळी मीराने जयला तेथून बाजूला घेऊन गेली. त्यांनतर स्नेहा पुन्हा जयशी बोलण्यासाठी रूममध्ये आली. त्यावेळी त्या दोघांच्यात बोलणं झालं. जयने आपलं मत स्नेहा समोर मांडलं. मात्र स्नेहा ते मिश्किलपणे हसून ऐकत होती. त्यांनतर ती तेथून उठून बाहेर गेली. आणि नंतर घरातील नवीन नॉमिनेशन टास्क सुरु झाला. आता स्नेहा आणि जयमध्ये पुन्हा पॅचअप होणार कि हे नातं इथेच थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.