मुंबई, 09 फेब्रुवारी : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी मधल्या काळात नव्या गाड्या खरेदी केल्या. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या महागड्या गाड्या घरी आणल्या. बिग बॉस फेम अभिनेत्री मिरा जगन्नाथ हिनं देखील डिसेंबर महिन्यात नवी गाडी खरेदी केली. पण दोन महिन्यातच मिराच्या गाडीचा अपघात झाला आहे. मीरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. सुदैवानं मिराला या अपघातात कोणतीही इजा झालेली नाही. पण तिच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. गाडीचा फोटो देखील शेअर केला आहे.
मिरानं डिसेंबर महिन्यात दत्तजयंतीच्या मुहूर्तावर हुंदाई कंपनीची ऑरा ही गाडी खरेदी केली होती. गाडीचे फोटो मिरानं सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. गाडीची पूजा करताना फोटो आणि व्हिडीओ देखील तिनं शेअर केले होते. दरम्यान कामासाठी बाहेर निघालेल्या मिराच्या गाडीला मागून धडक दिली. तिच्या गाडीचं मागच्या भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. पण तिचा जीव मात्र वाचलाय. यासाठी तिनं सर्वांचे आभार मानले.
हेही वाचा - Bigg Boss Marathi फेम किरण मानेंच्या हाती लागला मोठा सिनेमा; महेश मांजरेकरांसोबत करणार काम
गाडीच्या अपघाताचे फोटो मिरानं सोशल मीडियावर शेअर केले. तिनं म्हटलं, 'काही दिवसांआधी माझा अपघात झाला होता. देवाच्या कृपेनं आणि कुटुंबिय,चाहत्यांच्या प्रेमामुळे मी वाचले. मला काहीही झालं नाही. मी बरी आहे'. मिराच्या पोस्टनंतर सगळेच घाबरले मात्र तिला काही झालं नाही हे कळल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
गाडीचा अपघात नेमका कसा? आणि कुठे झाला हे काही मिरानं सांगितलेलं नाही. पण यात तिनं खूप नुकसान झालं आहे. मिरानं ह्युंदाई कंपनीची काळ्या रंगाची ऑरा गाडी खरेदी केली आहे. ज्याची किंमत सुरूवातीची किंमत 8-9 लाख रूपये इतकी आहे. मिरानं स्वकमाईतून घेतलेली ही तिची पहिली गाडी होती.
मिराच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर मिरा पहिल्यांदा 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून समोर आली. त्यानंतर बिग बॉस मराठी 4मध्ये ही सहभागी झाली होती. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मिरा आता स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.