मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mira Jagannath: बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचं टेलिव्हिजनवर कमबॅक; मिळाली नवी मालिका

Mira Jagannath: बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचं टेलिव्हिजनवर कमबॅक; मिळाली नवी मालिका

सगळ्यांची लाडकी मोमो आणि बिग बॉस मराठीमध्ये कल्ला करणारी मीरा जगन्नाथ पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे.  मीराला नवी मालिका मिळाली आहे.

सगळ्यांची लाडकी मोमो आणि बिग बॉस मराठीमध्ये कल्ला करणारी मीरा जगन्नाथ पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. मीराला नवी मालिका मिळाली आहे.

सगळ्यांची लाडकी मोमो आणि बिग बॉस मराठीमध्ये कल्ला करणारी मीरा जगन्नाथ पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. मीराला नवी मालिका मिळाली आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 17 ऑगस्ट: बिग बॉस मराठी सीझन 3 गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ. मीरानं बिग बॉसचं घर हलवून टाकलं होतं. प्रेक्षकांनीही मीराला प्रचंड प्रेम दिलं. मीरा शेवटपर्यंत खेळत राहिली. मीरानं बिग बॉसमध्ये जाण्याआधी टेलिव्हिजनवर काम केलं होतं. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील तिच्या मोमो या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मात्र बिग बॉसनं मीरा खरी ओळख दिली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मीराला अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स आल्याची माहिती समोर आली होती. मात्र मीरा आता कोणत्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतेय हे काही कळत नव्हतं. मीरानं स्वत: तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या नव्या कामाची माहिती दिली आहे. अभिनेत्री मीरा जगन्नाथनं येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. आपल्या अनोख्या शैलीमुळे मोमो प्रेक्षकांना आवडली. मीरा आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीराला नवी मालिका मिळाली आहे. अभिनेत्रीनं स्वत: सोशल मीडियावर क्विझ शेअर करत ही माहिती दिली आहे. 'माझा नवी प्रोजेक्ट कोणता असेल?', असा प्रश्न विचारत मीरानं चाहत्यांना तीन ऑप्शन्स दिले होते. ज्यात पहिला ऑप्शन 'चित्रपट', दुसरा 'सिरीयल' आणि तिसरा 'वेब सीरिज' होता. त्यातील दुसरा सिरीयल हा ऑप्शन बरोबर होता. यावरुनचं मीरानं ती टेलिव्हिजनवर कमबॅक करत असल्याची माहिती दिली आहे. तिची नवी भूमिका कशी असेल याविषयी तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. हेही वाचा - Maadhavi Nemkar : 'शालिनी' नाव कोरलेली पर्स, वरती साडी पण खाली पॅन्ट माधवीचा लुक फारच भन्नाट; पाहा फोटो आपण पाहिलं तर मीरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे अनेक फोटोशूट शेअर करत असते. मीरा तिच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देत असते. तिच्या नव्या सिरीयलसाठी तिनं विशेष मेहनतही सुरू केली आहे. काही दिवसांआधी मीरानं तिच्या नव्या प्रोजेक्टच्या शुटींगचे काही फोटो देखील शेअर केले होते. मीराच्या मोमो या व्यक्तिरेखेचं अनेकांनी कौतुक केलं होतं. मीराला देखील मोमो तिच्या फार जवळची होती.   मीरानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, 'मोमो या व्यक्तिरेखेमध्ये मी खूप गुंतून गेले आहे. दररोज मालिकेच्या निमित्तानं मला मोमोसारखं बोलावं लागतं. पण आता वैयक्तिक आयुष्यात देखील मी तिच्यासारखीच वागू लागली आहे. अनेकदा कुटुंबीय मला भूमिकेतून बाहेर ये म्हणून ओरडतात. मला असं वाटतंय मोमो आता माझ्या व्यक्तिमत्वात पुर्णपणे भीनली आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेतून बाहेर पडणं आता अशक्य वाटतंय'.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या