मुंबई, 1 एप्रिल- आज 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फूल आहे.आजचा दिवस जगभरात एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक आपल्याला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत असतात. थोडक्यात काय तर आपली फजिती करून घेण्याचा हा दिवस असतो. एखाद्या गोष्टीला आपण खूप गांभीर्याने घेतो पण वास्तवात ती गोष्ट झालेलीच नसते, आणि आपण फसतो, त्यालाच एप्रिल फूल म्हणतात. एप्रिल फूलचे अनेकांचे भन्नाट किस्से आपण ऐकले असतील. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अभिनेते किरण माने यांनी देखील त्यांच्या आयुष्यातील एक असाच एप्रिल फूलचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. विशेष म्हणजे हा किस्सा बिग बॉस मराठीच्या घरात घडलेला आहे.
किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. कधी राजकीय तर कधी सामजिक विषयावर किरण माने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून भाष्य करताना दिसतात. नुकताच त्यांनी बिग बॉस मराठीच्या घरातील एक एप्रिल फूलाच किस्सा सांगितला आहे.
किरण माने यंदाचे बिग बॉस मराठी चौथ्या सीजनमध्ये दिसले होती. बिग बॉस मराठीच्य घरातील चर्चीत चेहऱ्यापैकी किरण माने एक होते. बिग बॉसचं घर म्हटलं की , भांडण-तंटा आलाचय. किरण माने यांचे देखील अनेकांशी खटके उडत होते. या घरात देखील दोन ग्रुप पडले होते. ज्याचं शेवटपर्यंत एकमेकांसोबत पटलं नाही. किरण माने यांना देखील या वादामुळं सातत्याने नॉमिनेट केलं जायचं. आणि एक दिवस अचानक किरण माने घराबाहेर पडले. किरण माने घरातून गेले याचा अनेकांना आनंद झाला होता. पण बिग बॉसने त्यांना एका खासगी खोलीत ठेवून सगळ्यांचा वेगळाच गेम केला. जेव्हा किरण माने पुन्हा घरात आले तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. आणि सगळ्यांचाच एप्रिल फूल झाला होता. हाच किस्सा किरण माने यांनी सांगितला आहे.
वाचा-कुठून शोधता या पोझेस? सई नंतर नेटकऱ्यांचं अमृतावर लक्ष, अभिनेत्री ट्रोल
किरण माने म्हणतात, ''भन्नाट 'एप्रिल फूल' ! 'बिगबाॅस'मधल्या सदस्यांना एकहाती धोबीपछाड देणारे हे नादखुळा 'एप्रिल फूल' ! अपूर्वा,अक्षय,स्नेहलता,देशमुख वगैरे गॅंगला वाटत होते मी एलिमिनेट झालोय, घरी बसलो असेन. जेव्हा विकास म्हणाला की "राणी मुंगी म्हणजे दाद्या असेल" तेव्हा सगळे त्याची टर उडवत त्याच्यावर हसत होते. तेजू,प्रसाद वगैरेंना अंदाज होता "डाॅन कभी भी वापस आ सकता है." मी आल्यावर विक्या म्हणालावता,"दाद्या, आप तो मास्टरमाईंड हो. गेमचेंजर. आप को कैसे निकाल सकते है लोग?''
View this post on Instagram
किरण माने यांच्याबद्दलच्या या गोष्टी माहिती आहेत का?
किरण माने यांचा जन्म 5 एप्रिल 1970 रोजी सातारा जिल्ह्यातील मायणी गावात झाला. शालेय शिक्षणापासूनच त्यांना नाटक आणि नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती, पण त्यांचे जीवन तितके सोपे नव्हते. आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे.किरण माने यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकांची आवड होती आणि नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी किरण ऑटोमोटिव्ह नावाचे दुकान सुरू केले आणि ते त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस होते. त्यांनी त्यांच्या दुकानात गाड्यांचे तेल विकायला सुरुवात केली, पण नंतर त्यांना कमीपणा वाटू लागला की आपण काय करतो, त्यांच्या आयुष्यात अभिनय आणि नाटकाशिवाय आयुष्य फक्त बकवास आहे.
मग त्यांना पंडित सत्यद्रव कार्यशाळेच्या संदर्भात पेपरमध्ये एक जाहिरात दिसली म्हणून त्यांनी त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता, त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानाला कुलूप लावले आणि ते पुन्हा कधीही उघडले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment