मुंबई, 22 मार्च - किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यारपासून किरण माने विविध प्रोजेक्टवर काम करताना दिसत आहेत. असं जरी असलं तरी सोशल मीडियावरचा वावर त्यांचा कमी झालेला नाही. सतत किरण माने सोशल मीडियावर काहींना काही पोस्ट करत असतात. त्यांच्या पोस्ट नेहमीच लक्षवेधून घेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजिक परस्थितीवर भाष्य करताना दिसतात. आता देखील त्यांनी एक पोस्ट केली आहे. तिही किरण माने स्टाईलनं. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून एक खास सल्ला दिला आहे.
किरण माने यांनी शेतातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते शेतातल्या भाज्या जसं की कांद्याची पात, हिरव्या मिरच्या तोडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, "आरं कुठला आलाय व्यायाम आन् कुठली आलीय जीम...
तशी आमची लै येगळी गावरानी 'थीम' !
ताटामधी रोज असतो ताजा भाजीपाला,
चार मुठी घिवुन जातो, कुनीबी आला-गेला...
हृदयाच्या कप्प्यात असतं मानुसकीचं 'सिम'
तशी आमची लै येगळी गावरानी थिम !"
..कधीबी रानात गेलो की माझ्या नाटकासाठी माझा जिगरी दोस्त थळ्या लोखंडेनं ल्हीलेली ही कविता आठवती. खरंच शेतातला ताजा,टवटवीत,हिरवागार भाजीपाला खुडून रातीच्या जेवनात खान्यात जे सुख हाय, ते शब्दांत नाय सांगता येनार !
खायला नव्हतं अन्न, केला आत्महत्येचा प्रयत्न;'नाटू नाटू' फेम कोरिओग्राफरचं आयुष्य
शहरात रहानार्या आनि शेतीशी फारसा संबंध नसलेल्या माझ्या भावाबहिनींनाबी हा आनंद घेता येनं सहज शक्य हाय... कसं? आवो, 'सस्टेनेवल अर्बन फार्मिंग' करून... जरा इस्कटून सांगतो... शहरातल्या प्रत्येकानं आपल्या टेरेसवर, गॅलरीत, कुठल्याबी मोकळ्या जागेत मधी आपल्यापुरतं, छोटं का होईना 'फार्मिंग' करून बघा... फायद्यासाठी नाय बरं का.. 'जाणीव' म्हनून ! एकतरी भाजी आपली आपन पिकवायची आन् खायाची. ज्या दिवशी हे कराल ना, त्यादिवशी पयला घास पोटात गेल्यागेल्या 'जगात भारी' सुखाचा अनुभव घ्याल गड्याहो...करून तर बघा ! ❤️ अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. किरण माने यांच्या पोस्टला चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे.
View this post on Instagram
किरण माने यांचा जन्म 5 एप्रिल 1970 रोजी सातारा जिल्ह्यातील मायणी गावात झाला. शालेय शिक्षणापासूनच त्यांना नाटक आणि नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती, पण त्यांचे जीवन तितके सोपे नव्हते. आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे.
किरण माने यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकांची आवड होती आणि नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी किरण ऑटोमोटिव्ह नावाचे दुकान सुरू केले आणि ते त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस होते. त्यांनी त्यांच्या दुकानात गाड्यांचे तेल विकायला सुरुवात केली, पण नंतर त्यांना कमीपणा वाटू लागला की आपण काय करतो, त्यांच्या आयुष्यात अभिनय आणि नाटकाशिवाय आयुष्य फक्त बकवास आहे.मग त्यांना पंडित सत्यद्रव कार्यशाळेच्या संदर्भात पेपरमध्ये एक जाहिरात दिसली म्हणून त्यांनी त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता, त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानाला कुलूप लावले आणि ते पुन्हा कधीही उघडले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment