Home /News /entertainment /

जय-मीरानं तांबडा-पांढऱ्यावर मारला असा ताव! झणझणीत VIDEO एकदा पाहाच

जय-मीरानं तांबडा-पांढऱ्यावर मारला असा ताव! झणझणीत VIDEO एकदा पाहाच

मीरा आणि जयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही जेवणाचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत.

  मुंबई,21 जानेवारी-   'बिग बॉस मराठी'    (Bigg Boss Marathi)   चा तिसरा सीजन   (Season 3)  नुकताच संपला.या सीजनने प्रचंड लोकप्रियता मिळवली. बिग बॉसच्या घरात असणाऱ्या स्पर्धकांनादेखील प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमधील लोकप्रिय स्पर्धक असणाऱ्या जय दुधाणे  (Jay Dudhane)  आणि मीरा जगन्नाथची   (Meera Jagannath)  नुकताच भेट झाली. या भेटीचा एक व्हिडीओ व्हायरल होत ज्यामध्ये हे दोघे कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्यावर ताव मारताना दिसून येत आहेत. बिग बॉस मराठी संपल्यानंतरसुद्धा स्पर्धकांची मैत्री अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. हे स्पर्धक एकमेकींच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकताच विशाल विकास एकेमकांना भेटले होते. त्यांनतर उत्कर्ष आणि जय. तसेच मीनल नुकतंच सोनालीला भेटायला तिच्या घरी गेली होती. त्यांनतर आता जय आणि मीरा यांची भेट झाली आहे. या दोघांनी नुकताच एकमेकांना भेटून धम्माल केलेली दिसत आहे. जय आणि मीरा शेवट्पर्यंत एकाच ग्रुपमधून लढले. घरामध्ये त्यांची मैत्री फारच घट्ट झाली होती. ही मैत्री बाहेर येऊन आणखीनच फुलत आहे. मीरा आणि जयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही जेवणाचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. एका व्हिडीओमध्ये मीरा आणि जय झणझणीत मिसळ खात असलेल दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रश्यावर ताव मारताना दिसून येत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मीरा म्हणते, 'हॉट-हॉट मटन विथ हॉट-हॉट जय' तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये जय म्हणतो, 'स्पाईसी मिसळ विथ सुपर स्पाईसी मीरा'. या दोघांचे व्हिडीओ चाहत्यांना फारच पसंत पडत आहेत. या व्हिडीओचं लोकेशन त्यांनी कराड असं सांगितलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  नुकताच मीरा आणि जयने आपल्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग केलं आहे. जयने या शूटचे काही फोटो शेअर केले होते. यामध्ये जय लाल रंगाची धोतर नेसून तर मीरा गुलाबी रंगाची साडी नेसून अग्नी जवळ फेरे घेताना दिसून येत आहेत. हे दोघेही समुद्रकिनाऱ्यावर शूटिंग करताना दिसून येत आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहते फारच उत्सुक झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या