Home /News /entertainment /

'मैं कोल्हापूर से आयी हू..' कोल्हापूरची मिर्ची सोनाली पाटीलचा हा जबरदस्त डान्स VIDEO एकदा पाहाच!

'मैं कोल्हापूर से आयी हू..' कोल्हापूरची मिर्ची सोनाली पाटीलचा हा जबरदस्त डान्स VIDEO एकदा पाहाच!

नुकतचं सोनालीनं तिच्या नेहमीच्या म्हणजे कोल्हापूरी अंदाजात एक भन्नाट डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

    मुंबई, 8 मे- बिग बॉस मराठी (bigg boss marathi 3) फेम अभिनेत्री सोनाली पाटील (sonali patil ) इन्स्टावर चांगलीच सक्रीय दिसते. तिचे विविध फोटोशूट असतील किंवा तिचे रील्स नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असतात. नुकतचं सोनालीनं तिच्या नेहमीच्या म्हणजे कोल्हापूरी अंदाजात एक भन्नाट डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. सोनाली पाटीलनं इन्स्टावर मैं कोल्हापूर से आयी हू.......या गाण्यावर जबरदस्त डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तिनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, राम राम पाव्हणं...... मैं कोल्हापूर से आयी हू.......💞💕💖.. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू केला आहे. कुणी तिला कोल्हापूरची मिर्ची तर कुणी तिला कोल्हापूरचा रूबाब तर कुणी फक्त कोल्हापूरकर म्हणत तिच्या डान्सचे कौतुक केलं आहे. वाचा-Mother's Day: आलियाने शेअर केला आई-सासूसोबतचा Cool Photo,पोस्ट लिहीत म्हणाली.... सोनाली पाटीलने मराठी बिग बॉस सीझन 3 मधे आपली भाषा, व्यक्तिमत्व, आणि सौंदर्याच्या बळावर अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सोनाली बिग बॉस मराठीमुळं महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सोनाली पाटील मुळची कोल्हापूरची आहे. सोनाली शॉर्ट व्हिडिओ साठी खूप प्रसिध्द आहे. तिला TikTok गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. सोनालीनं छोट्या मोठ्या भूमिका साकारत आता मराठी मनोरंजन विश्वात तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
    सोनाली पाटीलने 'जुळता जुळता जुळतयं की', घाडगे अँड सून, देव पावला, 'देवमाणूस' आणि 'वैजू नं.१' यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या