मुंबई, 14 जून- मराठी बिग मराठी ( bigg boss marathi 3 ) बॉस फेम सोनाली पाटील (sonali patil ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या भन्नाट रील्समुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकतीच विकास पाटीलनं सोनलीसोबत एक फोटो शेअर करत लवकर बरी हो असं म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. तेव्हा चाहत्यांना समजलं की, सोनालीच्या हाताचा अपघात झाला आहे. मात्र हा अपघात कसा झाला याबाबत कुणाला माहिती नव्हती. आता सोनाली पाटीलनं याबद्दल माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी सोनाली पुण्यातील चाकण रोडवरून मित्रासोबत बाईकने जात होती. मागून भरधाव येणाऱ्या एका बाईकस्वाराने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनालीसह तिचा बाईक चालवणारा मित्र देखील खाली पडला. धडक जोरदार बसल्याने सोनाली जागीच बेशुद्ध पडली. अपघात झाल्यानंतर जमावाने सोनालीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला काही काळ आयसीयूमध्ये भरती केले होते.
वाचा- 'लग्नाशिवाय आम्ही..'BF आदिलसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच राखी म्हणाली असं काही
उपचारानंतर सोनालीला घरी विश्रांतीसाठी जाण्याची परवानगी दिली. या अपघातात तीच्या मानेलादेखील जोरदार हिसका बसला होता. त्यामुळे अजूनही मानेला त्रास होत असल्याचे ती सांगताना दिसते. तर सोनालीच्या हाताला गंभीर दुखापतही झाली होती. त्यामुळे आधारासाठी तिने आर्म स्लिंग घातली होती. सोनालीचा हाच फोटो विकासने सोशल मीडियावर शेअर केलेला पाहायला मिळाला. त्यावरून सोनालीचा अपघात झाल्याचे तिच्या चाहत्यांना कळले होते. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी अपघाताबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वतः सोनालीनेच एक व्हिडिओ शेअर करून या अपघाताची माहिती देण्याचा निर्णय घेतला.
काय होती विकास पाटीलची पोस्ट
सोनालीच्या हाताला दुखापत झाल्याचा फोटो विकास पाटीलनं (vikas patil) शेअर करत म्हटलं होतं की, एक हात गळ्यात असला तरी ताकद तेवढीच आहे पोरीत…आत्ताही सगळ्यांना लोळवू शकते 😎😁😝लवकर बरं व्हा आणि मैदानात उतरा पाटील 💪💪..
वाचा-'राज ठाकरे चटकन कुणाला जवळ करत नाहीत' भरत जाधवची 'ती' पोस्ट चर्चेत
सोनाली पाटील आणि विकास पाटील यांची मैत्री बिग बॉस मराठीच्या घरात जुळली. आजही घराबाहेर आल्यानंतर यांची मैत्री टिकून आहे. बिग बॉस मराठीच्या घऱात विशाल निकम, विकास पाटील, सोनाली पाटील आणि मीनल शाह यांच्यात मैत्रीपलीकडंही खास बॉन्डिग झालेले पाहायला मिळाल. आजही ही चार एकत्र फिरताना व भेटताना दिसतात.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.