News18 Lokmat

VIDEO :‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचा राजेशबद्दलचा खुलासा

तिच्यात आणि राजेशमध्ये तसं काहीच नसून, ते दोघे चांगले मित्र आहेत. बिग बॉसच्या घरात असे खूप कमी लोक होते ज्यांना ती ओळखत होती. राजेश हा माझा जुना मित्र असल्याने आमचं एकमेकांशी पटत होतं. माझा स्वभावच खूप मनमोकळा असल्याने बाहेरच्या लोकांना गैरसमज झाला असावा.

ram deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 08:01 PM IST

VIDEO :‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचा राजेशबद्दलचा खुलासा

मुंबई, १६ जुलै : सध्या मराठी ‘बिग बॉस’ प्रत्येक घरात सर्वांचा चर्चेचा विषय बनलाय. तब्बल ९३ दिवस ‘बिग बॉस’च्या घरातून काढल्याने काल रेशम टिपणीस घराबाहेर पडलीय. तीन महिन्याहून अधिक काळ घरात काढलेल्या रेशमने घराबाहेर आल्यावर न्यूज18 लोकमतशी तिच्या या प्रवासाबद्दल मत व्यक्त केलं. यामध्ये राजेश आणि तिच्याबद्दल जे टीव्हीवर दाखवलं तसं काहीच नव्हतं. आम्ही दोघे जुने आणि चांगले मित्र आहोत असं तिचं म्हणणं आहे.रेशम टिपणीस ही मराठी बिग बॉस मधील एक चांगली दावेदार मानली जात होती. तिने या घरात ३ महिने पूर्ण करून ती या आठवड्यात घराबाहेर पडली.  या ९३ दिवसांच्या तिच्या प्रवासामध्ये तिने खूप चढ उतार पाहिले. घराबाहेर तिच्या प्रति अनेक अफवा उठल्या आहेत. यामध्ये राजेशचं आणि तिचं अफेर सुरू आहे असं ही बोलण्यात आलं. पण घरातून बाहेर आल्यावर ती म्हणाली की, तिच्यात आणि राजेशमध्ये तसं काहीच नसून, ते दोघे चांगले मित्र आहेत. बिग बॉसच्या घरात असे खूप कमी लोक होते ज्यांना ती ओळखत होती. राजेश हा माझा जुना मित्र असल्याने आमचं एकमेकांशी पटत होतं. माझा स्वभावच खूप मनमोकळा असल्याने बाहेरच्या लोकांना गैरसमज झाला असावा.

ती पुढे म्हणाली की, सलग ८ वेळा नॉमिनेट झाल्याने ‘बिग बॉस’च्या घरात मी हा नवीन विक्रमच केलाय. तसंच या घरात राहून मला खूप काही शिकायला मिळालं. माझ्यातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी समोर आल्या. घरामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्याने मला खूप राग येत होता. पण काही काळानंतर मला त्याची सवय झाली आणि नंतर मला राग येणंच बंद झाला. खरंतर कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणे हे माझ्या स्वभावात नाही. त्यामुळे मी स्वतःला काही वेळ देण्यासाठी बिग बॉसच्या घरात आले होते, असे ती म्हणाली.

रेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

मी जर २ महिन्याहुन अधिक काळ या घरात काढला असता, तर कदाचित मी हा संपूर्ण प्रवास आरामात करू शकले असते. पण, माझी मराठी बिग बॉस जिंकायची इच्छा अपूर्णच राहिली अशी खंत व्यक्त केली. शेवटी ‘बिग बॉस’चं पाहिलं पर्व आता आसताद काळे याने जिंकावं अशी इच्छा तिने व्यक्त केली.

रेशम बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणारी पहिली स्पर्धक होती. ती या घरामध्ये ९० दिवस राहिली. तिच्या या घरामधील प्रवासामध्ये बरीच वळण आली, बऱ्याच घटना घडल्या, आव्हानं तिच्यासमोर आली पण तिने सगळ्या परिस्थितींवर मात केली. पहिल्या दिवसापासून रेशम टिपणीस चर्चेमध्ये राहिली. मग कुठल्या टास्कमुळे असो वा सई आणि मेघा मध्ये असलेल्या भांडणामुळे. रेशम, आस्ताद, सुशांत, भूषण, स्मिता यांच्यामधील मैत्री नेहेमीच चर्चेमध्ये राहिली. परंतु या आठवड्यामध्ये तिला बाहेर जावे लागले. रेशम टिपणीस या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली. रेशम टिपणीसला बिग बॉस यांनी एक खास अधिकार दिला ज्यानुसार कोणत्याही एका सदस्याला ती नॉमिनेशन पासून वाचवू शकते आणि रेशम हिने आस्ताद काळेला सुरक्षित केले. आणि म्हणूनच आस्ताद बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिमफेरीमध्ये पोहचणारा दुसरा स्पर्धक ठरला.

Loading...

संबंधित बातम्या

बिग बाॅस मराठी : सईने मागितली रेशमची माफी, रेशम माफ करणार का ?

कोण होणार कॅप्टन?,सई-रेशममध्ये राडा

बिग बाॅसच्या घरात 'हुकुमशहा' नंदकिशोर असा का वागला ?

आस्ताद कॅप्टन होणार?, सई-मेघामध्ये ताटातूट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...