Bigg Boss Marathi 2- वीणा- वैशाली कोणाचं ऐकेनात, घरात उडाला वादाचा भडका

Bigg Boss Marathi 2- वीणा- वैशाली कोणाचं ऐकेनात, घरात उडाला वादाचा भडका

वैशाली वीणाला म्हणाली, ‘मी तुझ्या बापाला घाबरत नाही’ त्यावर वीणाने तिला खडसावून सांगितले ‘माझा बाप काढू नकोस... तुझी लायकी नाही.’

  • Share this:

लोणावळा, 04 जून- आज बिग बॉस मराठीच्या घरात दोन सदस्यांमध्ये भाषेवरून वादाचा भडका उडणार आहे. ते दोन सदस्य म्हणजे वीणा आणि वैशाली. वैशालीने रुपालीशी बोलताना केलेल्या शब्दांच्या गैरवापरामुळे वीणा आणि वैशालीमध्ये वादाची ठिणगी उडाली आणि वाद वाढतच गेला. यात वैशालीने वीणाला बरंच काही सुनावलं. वीणाने वैशालीला आपल्या परिने समजावण्याचा प्रयत्न देखील केला.मात्र त्यावर ‘मी इथे काही सुधारायला आलेले नाही’ असे वैशालीने वीणाला सांगितले.

अरे देवा! प्रदर्शनापूर्वीच 'भारत'ची क्रेझ, या राज्यात तिकिटांसाठी रस्सीखेच

इतकेच नाही तर ‘तू माझ्या चुका काढू नकोस, ही तुला शेवटची ताकीद आहे,’ असे देखील वैशाली वीणाला म्हणाली. वीणाने वैशालीला सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला की, ‘तू माझ्यावर ओरडू नकोस आणि तुझ्या वॉर्निंगचा माझ्यावर काहीही फरक पडत नाही.’ ही सर्व बाचाबाची होत असताना वैशालीने अपशब्द उच्चारले तेव्हा किशोरी आणि वीणाने शिव्या देऊ नको असंदेखील तिला सांगितलं. हे भांडण इतकं वाढले की, वैशाली वीणाला म्हणाली, ‘मी तुझ्या बापाला घाबरत नाही’ त्यावर वीणाने तिला खडसावून सांगितले ‘माझा बाप काढू नकोस... तुझी लायकी नाही.’ आता हे भांडण का झाले? कोणामुळे झाले? पुढे काय होईल? हे आजच्या भागाl कळेलच.

Miss u मिस्टर- लग्नानंतरही जेव्हा मृण्मयी देशपांडेला लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये रहावं लागलं

याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरात नवनवीन टास्क बिग बॉस देत असतात... जे कधी मजेदार आणि कधी आव्हानात्मक असतात. आज घरात चोर बजार हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन दिवस असून या कार्यात दोन्ही टीम एकमेकांच्या विरुध्द खेळणार आहेत. टीम A चे सदस्य आज चोर असणार आहेत तर टीम B चे पोलीस आणि दुकानदार. चोरांनी दुकानदार आणि पोलिसांच्या गोष्टी चोरायच्या आहेत आणि त्या दुकानदारांना विकायच्या आहेत. दुसरीकडे दुकानदारांनी जास्तीत जास्त गोष्टी विकत घ्यायच्या आहेत तर पोलिसांनी चोरी होण्यापासून रोखायचे आहे. आता या टास्कमध्ये कोणती टीम विजयी ठरेल हे बघणे रंजक असणार आहे. सदस्यांना मिळणारे टास्क ते कशाप्रकारे पार पडतात हे या शो मधील महत्वाची बाब असते.

‘दयाबेन’ने शेअर केला आपल्या मुलीचा फोटो, चाहते म्हणाले, ‘वाह’

SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?

First published: June 4, 2019, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading