Bigg Boss Marathi 2: माधवचा विणाला टोमणा, 'तुला काहीच सांगायची गरज नाही कारण तुला जे पटतं तेच तू करतेस'

आज माधव देवचक्के आणि दिगंबर नाईक घरात जाणार आहे. विशेष म्हणजे दोघेही शिवला मोलाचा सल्ला देणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 02:25 PM IST

Bigg Boss Marathi 2: माधवचा विणाला टोमणा, 'तुला काहीच सांगायची गरज नाही कारण तुला जे पटतं तेच तू करतेस'

मुंबई, 20 ऑगस्ट- बिग बॉस मराठीच्या घरात आज पुन्हा जुन्या आठवणी, जुने स्पर्धक, जुनी मैत्री आणि गप्पा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आज घरात सिझन 2 चे घराबाहेर पडलेले काही सदस्य येणार आहेत. हे सदस्य घरात आल्यावर कोणते सल्ले देतील हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. आज माधव देवचक्के आणि दिगंबर नाईक घरात जाणार आहे. विशेष म्हणजे दोघेही शिवला मोलाचा सल्ला देणार आहेत. महेश मांजरेकर प्रत्येक आठवड्याला शिव आणि वीणाला जो सल्ला देतात तसंच घरातील इतर सदस्य आणि शिवच्या घरच्यांनी जो त्याला सल्ला दिला तोच सल्ला आज माधव आणि दिगंबर त्याला देणार आहेत.

दिगंबर नाईक शिवला म्हणाले की, 'मला आज ही संधी मिळाली म्हणून मी आलो. परत सांगणार नाही.. मी अधिकाराने सांगतो आहे तुला शेवटपर्यंत जायचं असेल तर ते तू ठरव कसं जायचं.' यावेळी नाईकने प्रश्नही विचारला, 'तू सगळ्यांनाच हो म्हणतोस आणि मग कसा बदलतोस?' आता यावर शिव काय उत्तर देणार ते पाहणं औत्सुक्याचं असेल. त्याला हे पटेल की नाही तेही आजच्या भागात कळेल.

आज माधव शिवला एक सुंदर कविता ऐकवणार आहे.  'दिल दुखा हे लेकीन तुटा तो नही है, उम्मीद का दामन छुटा तो नही है...' माधवने शिवला समजावत म्हटलं की, फार थोडेच दिवस उरले आहेत इतक्या छानप्रकारे दिवस गेले..  मी काय म्हणतो आहे ते फक्त तुला कळेल आणि मला तेच हवं आहे.'

आता नक्की याचा अर्थ काय आहे हे आजच्या भागामध्ये कळेलच. तर वीणाला माधव म्हणाला की तुला काहीच सांगायची गरज नाही कारण तुला जे पटतं तेच तू करतेस. आजच्या भागात अजून कोण कोण येणार आहे आणि ते घरातील स्पर्धकांना काय मेसेज देतील तसंच एकंदरीत आज काय धमाल- मस्ती होईल ते पाहण्यासाठी आजचा भाग पाहायला विसरू नका.

Man vs Wild मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला रेकॉर्ड

Loading...

...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल

इंटरनेटवर लीक झालेत या अभिनेत्याचे सेक्स सीन

अखेर करण जोहरने सांगितलं त्या Drugs Party चं सत्य

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...