मुंबई, 20 जून- बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यामध्ये बरीच भांडणं, वाद, आरोप- प्रत्यारोप सध्या सुरु आहेत. याच टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉसने विरोधी टीमला हरविण्यासाठी साम, दाम दंड, भेदचा उपयोग चातुर्याने करायला सांगितलाय. तसेच टास्कमध्ये दिलेली ऑर्डर एकाच टीमने पूर्ण करायची आहे हे देखील स्पष्ट सांगितलं. हे सर्व असूनही परागने स्वत:लाच मॅनेजर केले आणि त्यामुळे दोन्ही टीममध्ये वादाची ठिणगी उडाली.
या टास्कमध्ये मॅनेजरमध्ये झालेल्या डीलनुसार विणाच्या टीमने परागच्या टीमला मान्य केलेले दोन कपडे द्यायचे आहेत. परंतु विणाच्या टीमने कपडे न देण्यासाठी उत्तम योजना आखली आहे. वीणाची टीम परागला त्यांच्या टीमचा मॅनेजर सुट्टीवर गेल्यामुळे ते कपडे देऊ शकणार नाहीत असं सांगणार आहेत. पण नेमकी याच गोष्टीवरून विणा- परागमध्ये वाद होणार आहे. याच टास्क दरम्यान पुन्हा शिवविरुद्ध नेहा हे दृश्य दिसणार आहे. यात शिव साम, दाम दंड, भेद हे मोठ्या आवाजात बोलतो.
GMA 2019 मध्ये ग्रीन आउटफिटमध्ये दिसली दीपिका पदुकोण
VIDEO- सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दबंगपेक्षा कुत्र्यानेच जिंकलं मन
यामुळे समोरच्या टीमची चिडचिड होते आणि यात परागचा राद अनावर होत तो देखील शिवला टक्कर देत साम, दाम दंड, भेद असे मोठ्या आवाजात बोलू लागतो. परंतु यामुळे परागलाच याचा त्रास तर होणार नाही ना हे आजच्या भागामध्ये कळेल. घरात होणाऱ्या टास्क मध्ये सदस्यांनी स्वत: संयम ठेवणे अत्यावश्यक असते परंतु हे त्यांना कधी समजणार कोणास ठाऊक. दरम्यान, या टास्कमध्ये शिव समोरच्या टीमची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगत आहे आणि याच टास्क दरम्यान एकमेकांच्या टीमला हरविण्यासाठी सदस्य बऱ्याच योजन आखताना दिसत आहेत.
काल बिग बॉसनी सांगितल्याप्रमाणे आता प्रत्येक टीम त्यांना पटेल त्याप्रमाणे योजना आखून दुसऱ्या टीमला मात देण्याच्या प्रयत्नात आहेत... प्रत्येक टीमने दुसऱ्या टीमच्या मॅनेजरकडून त्या टीमने तयार केलेले कपडे मान्य करून घ्यायचे आहे. हेच लक्षात घेता धुतलेले कपडे वाळवल्यानंतर त्याला इस्त्री करून ठेवायचे आहेत. यावर चलाकी म्हणून आत शिव विरोधी टीमची इस्त्री चोरणार आहे. आता ही इस्त्री ते कसे परत मिळवतील. ते इस्त्री बळाचा वापर करून मिळवतील की युक्तीचा वापर करून हे प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच.
आमिर खानने मुंबईत प्रॉपर्टी घेतली विकत, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत