मुंबई, 08 सप्टेंबर : बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व नुकतंच संपलं. यावर्षी अमरावतीचा शिव ठाकरे या पर्वाच्या विजेतेपदाचा मानकरी ठरला. बिग बॉसमध्ये शिव रोडीज या रिअलिटी शोमध्ये लोकप्रिय ठरला होता. या शोच्या उपांत्य फेरीपर्यंत त्यानं मजल मारली होती. त्यानंतर बिग बॉसमध्येही तो त्याच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सच्या जोरावर 100 दिवस टिकून राहीला आणि दुसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. मात्र त्याच्या परफॉर्मन्ससोबतचं तो प्रेक्षकांच्या लक्षात राहीला ते वीणा जगतापसोबतच्या नात्यामुळे. या दोघांचं नातं घरातून बाहेर पडल्यानंतर संपेल असा अंदाज अनेकांनी लावला होता मात्र या दोघांनी या सर्व शक्यतांना ब्रेक लावला आहे.
वीणानं काही दिवासांपूर्वीच शिवच्या नावाचा टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेतला होता. त्यानंतर आता ती नुकतीच शिवच्या आईला सुद्धा भेटली आहे. शिवनं त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला शिवनं कॅप्शन दिलं, ‘अखेर राणी माझ्या जिजाऊला भेटली.’ शिवच्या आईचा वाढदिवस नुकताच झाला. यावेळी वीणा आणि शिवनं एकत्र आईचा वाढदिवस साजरा केला. हे फोटो वीणानं सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली अभिनेत्री, नंतर घडलं असं काही की...
View this post on Instagram
⭐️Finally.... ❤️Rani meet aapli jijau😉⛳️ @veenie.j @colorsmarathiofficial @endemolshineind
काही दिवसांनंतर म्हणजेच 9 सप्टेंबरला शिवचा वाढदिवस आहे आणि यासाठी विणानं त्याला त्याआधीच एक सरप्राइझ बर्थडे गिफ्ट दिलं आहे. वीणानं नुकताच शिवच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढून घेतला. याचे फोटो शिवनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना शिवनं लिहिलं, ‘आपल्या राणीचं अॅडव्हान्स बर्थडे गिफ्ट. आईशप्पथ हे तर आभाळाएवढं मोठं गिफ्ट आहे. यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही वीणा.’ शिव आणि विणाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
Birthday Special : 'त्या' निर्णयामुळे आशा भोसले लता दीदींपासून होत्या दुरावल्या
या अगोदर शिवनं सुद्धा बिग बॉसच्या घरात वीणाच्या नावाचा टॅटू काढून घेतला होता. घरातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली होती. मात्र त्याचं हे नातं घरातून बाहेर पडल्यानंतर टिकणार नाही असंच सर्वांना वाटत होतं मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर शिवनं मी आईला मनवून वीणाशी लग्न करेन आणि अख्ख्या महाराष्ट्राला आमच्या लग्नाची पत्रिका जाईल अशी प्रतिक्रिया देत सर्वांची बोलती बंद केली होती. त्यानंतर आता वीणानं त्याच्या नावाचा टॅटू काढल्यानं त्यांचं नातं फक्त घरातला दिखावा नव्हता हे स्पष्ट झालं.
प्रियांका चोप्रा म्हणते, मला आई व्हायचंय, पण...
रोडीजच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकला होता. पण ‘बिग बॉस मराठी 2’नं त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला तो थोडा शांतच राहिला. पण नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहीला. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यानं तो वेळोवेळी नॉमिनेशनपासूनही वाचत आला होता.वीणा जगतापसोबतची त्याची मैत्री विशेष चर्चेता विषय ठरली.
============================================================
असे असतील मुंबईतील 3 नवीन मेट्रो मार्ग, पाहा SPECIAL REPORT