Bigg Boss Marathi: मेघा धाडेच्या पतीने व्यक्त केले, 'बिग बॉस मराठी'बद्दलचे आपले मत

Bigg Boss Marathi: मेघा धाडेच्या पतीने व्यक्त केले, 'बिग बॉस मराठी'बद्दलचे आपले मत

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर कोण नाव कोरणार हे जाणून घ्यायची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे

  • Share this:

मुंबई, २२ जुलैः बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर कोण नाव कोरणार हे जाणून घ्यायची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. सर्वसामान्य जनतेला जर ही उत्सुकता असेल तर विचार करा स्पर्धकांच्या नातेवाईकांना किती असेल. प्रत्येकालाच आपला आवडता स्पर्धक विजेता व्हावा असं वाटत आहे. यात अनेकांच्या तोंडी मेघा धाडे आणि सई लोकूरचं नाव प्रामुख्याने येत आहे. मेघा विजयी होणार का याबद्दल आता तिच्या पतीनेच आपलं मत व्यक्त केलं आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मेघाचा पती आदित्य पावस्करने बिग बॉस मराठीबद्दल बोलताना सांगितले की, पहिल्या दिवसापासून मेघाने तिचा खेळ उत्तमरित्या खेळला. यामुळेच ती शेवटच्या दिवसापर्यंत टिकू शकली. त्यामुळे मेघा बिग बस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती होईल याची मला १०० टक्के खात्री आहे. ती माझी पत्नी आहे म्हणून मेघा जिंकेल असं मी अजिबात म्हणत नाही.. पण एकंदरीत आतापर्यंतचा तिचा खेळ आणि लोकांचा कल या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करुनच मी बोलत आहे.

आतापर्यंत मेघा बिग बॉसच्या घरात जशी राहिली, खऱ्या आयुष्यातही ती तशीच आहे. आतापर्यंत पुष्कर आणि सईने मेघाचं वागणं खोटं असल्याचे अनेक आरोप केले. पण ती खऱ्या आयुष्यात कशी आहे हे त्यांनी कुठे पाहिलं आहे. ती शोच्या पहिल्या दिवसापासून जशी आहे तशीच शेवटच्या दिवसापर्यंत वागत आली आहे. एवढे दिवस कोणीही मास्क लावून त्या घरात फिरू शकत नाही. उलट इतर स्पर्धकांच्या वागण्यात सातत्याने बदल होत होते, असं आदित्य म्हणाला. मेघाच्या स्वभावाबद्दल बोलताना आदित्य म्हणाला की, मेघा अनेकदा भावनेच्या भरात निर्णय घेते. मैत्रीखातर आस्ताद आणि पुष्करची साथ देणं ही तिची या खेळातली सर्वात मोठी चूक होती. त्या दोघांना पाठीशी घातल्यानेच ती अडचणीत आली, असंही आदित्यने स्पष्ट केले.

हेही वाचाः

'...तर आम्ही एकमेकांचा विचार नक्की केला असता'

 

बिग बाॅस मराठीत मेघा का वागते आक्रमक?

महिला स्पर्धक जिंकणार का 'बिग बॉस' फिनाले?

First published: July 22, 2018, 6:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading