मुंबई, 11 मे- यंदा 'बिग बॉस मराठी'चा
(Bigg Boss Marathi 3) तिसरा सीजन प्रचंड गाजला. या शोमध्ये मराठी कलाकरांसोबत अनेक चेहरे नव्याने पाहायला मिळाले. यामध्ये काही चेहरे असेही होते ज्यांनी हिंदी रिऍलिटी शो गाजवले आहेत. ती नावं म्हणजे जय दुधाणे आणि मीनल शाह
(Meenal Shah) होय.ही कलाकार मंडळी स्प्लिट्सव्हिला आणि रोडीज सारखे हिंदी रिऍलिटी शो गाजवून मराठी बिग बॉसमध्ये दाखल झाली होती.मीनल शाहबद्दल सांगायचं तर तिला मराठी बिग बॉसमध्ये प्रचंड लोकप्रियता आणि प्रेम मिळालं आहे. तिचा मराठमोळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहते शो नंतरसुद्धा सतत तिच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. तर तिच्या चाहत्यांना हे ऐकून आनंद वाटेल की, मीनलने नुकतंच एक नवी कोरी जीप
(New Jeep) खरेदी केली आहे.
मीनल शाहने नुकतंच एक जीप खरेदी केली आहे. त्यामुळे ती सध्या प्रचंड आनंदी आहे. मीनल शाहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअरकेला आहे . यामध्ये ती आपल्या नव्या जीपसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ एक इन्स्टा रील आहे. यामध्ये मीनल आपल्या जुन्या जीपसोबत उभी दिसत आहे. ती ब्लॅक कलरची असते. त्यांनतर ती काही क्षणात बदलून त्या ठिकाणी नवी जीप उभी असते. ही नवी जीप रेड कलरची आहे. अशाप्रकारे इन्स्टा रीलच्या माध्यमातून मीनलने आपल्या नव्या जीपची माहिती दिली आहे. या जीपची किंमत 53 ते 57 लाखांपर्यंत आहे.रुबिकॉन जीप अनेक सोयी सुविधांसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये क्रूझ कंट्रोल, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कीलेस 'एंटर अँड गो', पुश बटण स्टार्ट आणि अशा अनेक गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
मीनल शाहने आपल्या नव्या जीपचा व्हिडीओ शेअर करताच चाहते आणि कलाकार मित्र तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मीनलचा बिग बॉसमधील सह स्पर्धक आणि अभिनेता विकास पाटीलने यावर कमेंट करत, 'अभिनंदन,चला राईडवर' असं म्हटलं आहे. मीनलसुद्धा फारच आनंदी दिसत आहे. मीनल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेसुद्धा तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत असतात.
मीनलबद्दल सविस्तर सांगायचे तर,ती एक उत्तम डान्सर आहे. यासोबतच तिला अभिनयाची आवड देखील आहे. तिने मॉडेलिंग केलं आहे. 2017 मध्ये एम टीव्हीच्या 'रोडीज' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून झळकली होती. यात कठीण टास्क खेळून ती सेमी फायनलिस्ट झाली होती. रोडीज या रिअॅलिटी शोमुळे मीनलला तुफान प्रसिद्धी मिळाली अगदी सोशल मीडियावर तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्या देखील वाढली होती. नानचाकू आणि मार्शलआर्टस्चे प्रशिक्षण घेतलेल्या मीनलला वेगवेगळ्या टास्कदरम्यान याचा खूप फायदा झाला होता. या शोनंतर मीनलने काही जाहीरातीत देखील काम केलं आहे. यामुळेच ती मनोरंजन क्षेत्राशी जोडली गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.