Bigg Boss Marathi 2- वीणा- रुपालीमध्ये आला दुरावा, रडण्यासाठी घेतला उशीचा आधार

Bigg Boss Marathi 2- वीणा- रुपालीमध्ये आला दुरावा, रडण्यासाठी घेतला उशीचा आधार

वैशालीचं बोलणं ऐकून रुपालीला धक्का बसतो आणि ती जमिनीवर कोसळते. तेव्हा नेहा तिच्या मदतीला धावून येते.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरात रुपाली आणि वीणा यांची खुप घनिष्ठ मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. ही गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्याइतर  सदस्यांना सांगितली आहे. एकच फाईट वातावरण टाईट या टास्कमध्ये किशोरी शहाणे यांच्यावरचा राग व्यक्त करताना रुपाली म्हणाली होती की, ‘वीणा आणि शिवबद्दल जी गोष्ट बोलीस ती मला आवडली नाही. कारण मी तिच्याबद्दल ओव्हर प्रोटेक्टीव्ह आहे आणि राहीन.’ शिवला देखील रुपाली याच कारणामुळे बोलताना दिसते.  मी आणि वीणा बोलत असताना किशोरी ताईंनाही मी मध्ये येऊ देत नाही तर तू असं करू नकोस असं रुपाली अनेकदा शीवला म्हणाली आहे. पण आता या मैत्रीमध्ये कुठेतरी फुट पडताना दिसत आहे.

आज देखील वीणाबद्दल बोलताना रुपालीने घरतील इतर सदस्यांना सांगितले की, ‘हक्क हा फक्त एका बाजूनेच नसतो तो दोन्ही बाजूंनी हवा. मी पूर्ण आजारी आहे अशातला भाग नाही. पण माझा पाय खरंच दुखत होता. माझ्याकडे शिवसारखा कोणी मित्र नाहीये, जो मला भरवेल किंवा दिवसभर माझी काळजी घेईल. पण तू जर ठामपणे म्हणतेस तू ती व्यक्ती आहेस मग तू दिसत नाहीस. वागना मग तशी, काल  मी रात्री झोपले तेव्हा रडत होते. पण बाजूला झोपलेल्या माणसाच्या मनामध्ये इतका राग आहे  की मला एकदाही विचारलं नाही खरच त्रास होतो आहे का?

लग्नाच्या आठ वर्षांनंतर या अभिनेत्याच्या घरी आली ‘नन्ही परी’

यावर वैशाली म्हणाली की, तुम्ही एकमेकींना खूप समजून घेता असं जे म्हणता पण ते तसं दिसत नाही. त्यामुळे आता तुमच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह आलं आहे. यावर अभिजीत केळकर म्हणाला, ‘मला वाटत की, ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. त्या दोघींनासुध्दा एकमेकींना काय वाटतं ते कळलेलं आहे. त्यामुळे त्या दोघींनी एकमेकींशी बोलावं किंवा बोलू नये त्यांना ठरवू दे. कोणी कोणाची बाजू घेऊ नका आणि कोणाच्या विरुध्द देखील बोलू नका.’

दरम्यान आज घरात कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. घरातील जे सदस्य एकमेकांच्या पाठीमागे त्यांना नाव ठेवत होती, त्यांच्याबद्दल बरंच काही वाईट बोलत होते, तसेच त्यांना घरातून कसं बाहेर काढता येईल याबद्दल प्लॅनिंग करत होते, तेच आता एकमेकांशी बोलताना, मजा मस्ती करताना दिसत आहेत. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉसकडून खूप मोठी शिक्षा मिळाली, ज्यामध्ये सदस्यांना कठोर शब्दांमध्ये खडसावण्यात आले.

या अंधश्रद्धेमुळे आयुष्यभर अविवाहित राहिले संजीव कुमार

अतिथी देवो भव: या टास्कमध्ये टीम ए आणि टीम बीमधील सदस्यांनी उत्तम कामगिरी केली आणि दोन्ही टीममधील एका सदस्याला कॅप्टन होण्याची संधी मिळणार आहे. कॅप्टनसीची उमेदवारी कुठल्या दोन सदस्यांना द्यावी हे टीमने सर्वानुमते ठरवायचे आहे असे बिग बॉसनी सदस्यांना सांगितले. रुपाली आणि अभिजीत ही दोन नावे पुढे आली आणि यांच्यामध्येच आज कॅप्टनसी टास्क रंगणार आहे.

यात विरुध्द टीमच्या उमेदवाराला फोन ठेवण्यास भाग पाडायचे आहे. दरम्यान, वैशालीने रुपालीला डिवचत म्हटलं की, ‘तुला वाटंत का तू कॅप्टन होण्याच्या लायकीची आहे.. तू टास्क जिंकण्यासाठी तुझ्या भावाला वापरलंस.’ वैशालीचं हे बोलणं ऐकून रुपालीला धक्का बसतो आणि ती जमिनीवर कोसळते. तेव्हा नेहा तिच्या मदतीला धावून येते. आता पुढे काय होईल...रुपाली आणि अभिजीतला फोन ठेवायला भाग पाडण्यासाठी सदस्य काय काय ऐकवतील.. यात कोणता सदस्य बाजी मारेल हे पाहणे रंजक असणार आहे.

‘याला तर इज्जत काढून घ्यायची सवयच लागली’, पुन्हा एकहा हृतिकवर भडकली रंगोली चंडेल

EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

First published: July 9, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading