Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi: बॉग बॉसने दिली कठोर शिक्षा! तीन सदस्यांना केलं थेट नॉमिनेट

Bigg Boss Marathi: बॉग बॉसने दिली कठोर शिक्षा! तीन सदस्यांना केलं थेट नॉमिनेट

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या घरात नवनवीन टास्क पाहायला मिळत आहेत. त्यामुळे साहजिकच स्पर्धकांमध्ये राडेही होत आहेत.

  मुंबई, 21ऑक्टोबर- 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या घरात नवनवीन टास्क पाहायला मिळत आहेत. त्यामुळे साहजिकच स्पर्धकांमध्ये राडेही होत आहेत. नुकताच घरात पार पडलेल्या 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक”या कॅप्टन्सी कार्यात अनेक वादविवाद तर झालेच शिवाय धक्काबुक्की आणि नियमांचं उल्लंघनदेखील करण्यात आलं आहे. त्यामुळे बिग बॉसकडून स्पर्धकांना कठोर शिक्षा मिळाली आहे. यामध्ये घरातील ३ सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट(Nominate) केलं गेलं आहे.
  काल झालेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसकडून घरातील काही सदस्यांना मिळाली कठोर शिक्षा मिळाली आहे. हे सदस्य म्हणजे विशाल, स्नेहा आणि गायत्री बिग बॉसकडून थेट नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरातील “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” या कॅप्टन्सी कार्या दरम्यान काल घरामध्ये बरेच राडे बघायला मिळाले होते. बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांनी नियमभंग देखील केले. आणि याचमुळे बिग बॉसने सदस्यांची कडक शब्दात केवळ कानउघडणीच नाही केली तर विशाल, गायत्री आणि स्नेहा यांना त्याचे परिणाम देखील भोगावे लागले आहेत. कुठलेही कार्य पार पाडताना वेगवेगळया युक्त्या वापरणे योग्यच असते. पण, ते पार पाडत असताना धक्काबुक्की होणे, कुठल्याही सदस्याला शारीरिक इजा होणे अतिशय निंदनीय आहे.
  बिग बॉसने जय, उत्कर्ष, विकास आणि आदिशला सक्त ताकीद दिली आहे. तर, विशाल निकमने काल बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टिचे नुकसान केले होते आणि त्यामुळे या कृत्याचा बिग बॉस यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रॉपर्टिचे नुकसान ही अक्षम्य चूक असल्याने विशालला बिग बॉस यांनी शिक्षा म्हणून पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केलं आहे. ताकीद दिल्यानंतरदेखील काही सदस्यांकडून नियमांची पायमल्ली करण्यात आली. हे कार्य खिलाडूवृत्तीने खेळायचे होते. पण तसं झालं नाही.कार्यामध्ये आक्रमकता आणि धक्काबुक्की केली गेली. ही वागणूक लज्जास्पद असल्याचं सांगत बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. बिग बॉस यांनी साप्ताहिक कार्य रद्द केले. तर गायत्री आणि स्नेहा रागावरचे नियंत्रण गमावून आक्रमक झाल्या ज्यामुळे सदस्यांना शारीरिक इजा होण्याची शक्यता होती. आणि बिग बॉस यांना हे अमान्य आहे. म्हणूनच त्या दोघींना देखील पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट करण्यात आलं आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi च्या घरात टास्कमध्ये कोणत्या टीमचा भोपळा फुटणार?) दरम्यान आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्नेहा आणि जयची मस्ती बघायला मिळणार आहे. त्यांच्यामधील मैत्रीची चर्चा तर सगळीकडेच आहे. आज घरामध्ये काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज घरामध्ये कॅप्टन कोण बनणार याची उत्सुकता सगळ्यांन लागून राहिली आहे. कारण, कालच्या भागामध्ये दाखविल्याप्रामाणे आज एका कार्याद्वारे घरातला कॅप्टन कोण होणार हे आपल्याला समजणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या