मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss च्या घरात सोनालीच चाललंय तरी काय ? आधी भातावरून अन् आता चपातीवरून आदिशसोबत वाद

Bigg Boss च्या घरात सोनालीच चाललंय तरी काय ? आधी भातावरून अन् आता चपातीवरून आदिशसोबत वाद

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये काल सोनालीचं भात (Sonali patil) वाफवण्यावरून तृप्तीताईंशी वाद झाला आणि आज चपाती बनवण्यावरून आदिशसोबत (adish vaidya) वाद होणार आहे.

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये काल सोनालीचं भात (Sonali patil) वाफवण्यावरून तृप्तीताईंशी वाद झाला आणि आज चपाती बनवण्यावरून आदिशसोबत (adish vaidya) वाद होणार आहे.

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये काल सोनालीचं भात (Sonali patil) वाफवण्यावरून तृप्तीताईंशी वाद झाला आणि आज चपाती बनवण्यावरून आदिशसोबत (adish vaidya) वाद होणार आहे.

मुंबई 20 ऑक्टोबर : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये वादाला सुरूवात झाली की सदस्य थांबायचं नावच नाही घेत. पण, किचन एरियामध्ये स्वयंपाक बनवताना असो वा जेवताना असो भांडण करू नका, वाद करू नका, शक्यतो ते टाळा असे अनेकवेळा सांगून देखील सदस्य काही सुधारायचे नाव घेत नाहीत. शब्दाला शब्द वाढत जातो आणि वाद अजून वाढतो. असं काहीसं आज आदिश आणि सोनालीच्या बाबतीत होणार आहे. काल सोनालीचं भात (Sonali patil) वाफवण्यावरून तृप्तीताईंशी वाद झाला आणि आज चपाती बनवण्यावरून आदिशसोबत (adish vaidya) वाद होणार आहे.

सोनालीने विचारले, “बाकीची लोकं उभं राहिली आहेत त्यांच्यासाठी... त्यावर आदिशचं म्हणण आहे, “आता जाऊ देना ती (गायत्री) करते आहे ना...ती लाटते आहे, तिला लाटू दे तिच्या पध्दतीने. त्यावर सोनाली म्हणाली, मी कुठे नाही म्हणाले...  आदिश म्हणाला, मी फक्त सांगतो आहे, म्हणून तुला विचारलं तू पूर्ण लाटणार आहेस का ? आणि इथून वादाला सुरुवात झाली. सोनाली म्हणाली, तू सांगू नकोस मला, मी तुला विचारूनच तिथे उभी राहिली. गायत्री म्हणाली तू मला नाही विचारलं. आदिश त्याचं मत मांडत होता. तेव्हा सोनाली आदिशला म्हणाली, तू हे मगाशीच बोलायचं होतसं, मागाशी बोलास का तू ? तुला माहिती नव्हतं मग मगासपासून काय ऐकतो आहेस तू ? आता बोलतो आहे शेवटी. आणि सोनालीचा आवाज चढला.

ओळखलं का फोटोतील 'या' चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची लोकप्रिय गायिका

आदिश म्हणाला, “एक मिनिट आवाज चढवू नकोस माझ्यावर, फुकट आवाज नाही चढवायचा. सोनालीचे म्हणणे आहे मी आवाज नाही चढवत आहे, तू बोलायला लागलास तर मी उत्तरं नाही द्यायचं का ? आणि कुठल्या आवाजात सांगायचं ते तू मला नको सांगूस. माझा आवाज असाच आहे मी असंचं बोलणार... आणि वाद पुढे वाढत गेला. बघूया पुढे काय झालं आजच्या भागामध्ये.तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सीजन न तिसरा.

DDLJ: 'राज-सिमरन'च्या केमिस्ट्रीची 26 वर्षे पूर्ण!सैफला मिळाली होती ऑफर

आता दिवसेंदिवस खेळ रंगत चालला आहे. प्रत्येक स्पर्धक शोमध्ये  टिकून राहण्यासाठी काहीही करताना दिसत आहे. यामध्ये घरात दोन ग्रुप तयार झाले आहेत तर दुसरीकडे दररोज घरात भांडणाचा  जोर सुरूच आहे.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, TV serials