
बिग बॉस मराठीमध्ये चॅलेंजर्स म्हणून राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर आणि मीरा जगन्नाथ यांची एंट्री झाली आहे.

त्यातील राखी सावंत हिनं तर आल्या दिवसापासूनच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू केला आहे.

अशातच आता विशाल आणि राखी या दोन वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्येंच भांडणं पाहायला मिळाली. आज घरात राखी VS विशाल बघायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली.

अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, तुला झोपायचं नाहीये का ? तुला नाच करायचा आहे ? लाईट बंद झाले ना ? त्यावर अमृता म्हणाली, झोपते आहे कि. त्यावर राखी म्हणाली, मग झोप. आणि इथून वाद सुरु झाला.

अमृता म्हणाली, मला नाही झोपायचं इतक्यात. त्यावर राखी तिला म्हणाली, माझ्या डोक्यावर का नाचतेस ? अमृता म्हणाली, मी इथे बसून नाचते आहे.

राखी तेजस्विनीला म्हणाली, मी रात्री बसते तुझ्या डोक्यावर थांब, इडियट माझी झोपच गेली. आता सगळे झोपल्यानंतर मी बोलणार... उगीच भांडणं ना?

यावर विशाल राखीवर चांगलाच भडकला. विशाल त्यावर म्हणाला, आता झोपा ना तुम्ही. राखी त्यावर म्हणाली, आता नाही झोपणार माझी झोप गेली. बोलणार मी आता. माझी मर्जी.

विशाल म्हणाला, तिला शिकवता आणि तुम्ही काय करताय ? तिला का बोलताय एवढं तोंड वर करून.

त्यावर राखी म्हणाली, मी तेच करते आहे जे ती करत होती. विशाल म्हणाला, गप बसायचं. राखी म्हणाली, तू गप बस. वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्येच झालेली भांडणं आता काय रंगत आणणार हे आजच्या भागात कळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.