मुंबई, 9 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम बिग बॉसची मोठ्या प्रमाणावर क्रेझ पहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बिग बॉस मराठीचा सीझन चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. बिग बॉस मराठी 4 सध्या जोरदार चर्चेत असून बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांविषयीही प्रेक्षक बोलताना दिसत आहे. अशातच बिग बॉसच्या घरातून नुकतीच तेजस्विनी लोणारी बाहेर पडली. तेजस्विनीला तिच्या हाताला दुखापत झाल्यामुळे बाहेर पडावं लागलं. मात्र ती बाहेर पडल्यामुळे तिचे चाहते खूप नाराज झाले. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तेजस्विनीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेमही मिळत असल्याचं दिसून येत आहे.
तेजस्विनी लोणारी बिग बॉस बाहेर पडल्याचं कोणालाही पटलं नाहीये. मात्र तिला हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला नाईलाजाने बाहेर यावं लागलं. तिचे चाहते तिच्यावर खूप साऱ्या प्रेमाचा वर्षाव करत असून तूच आमच्यासाठी वीनर असल्याचं सांगत आहे. तिच्यासाठी खास पोस्ट, खास गिफ्टही देत आहे. एवढं सगळं प्रेम पाहून तेजस्विनीही भावुक झाली आहे. तीनं तिच्या चाहत्यांचं आणि तिला सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांचं आभारही मानलंय. अशातच तेजस्विनीने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलीये. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्य एक ट्रॉपी आणि केक दिसत आहे. तेजस्विनीच्या चाहत्यांनी तिलाच 'बिग बॉस मराठी 4' चं वीनर मानलं असून ही ट्रॉफी तिच्या घरी पाठवली आहे. या ट्रॉफीवर आणि केकवर लिहिलं आहे, 'बिग बॉस मराठी 4 पब्लिक वीनर'. चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाला पाहून तेजस्विनी म्हणाली, 'माझ्यासाठी हा विजय आहे! हे मी जिंकले आहे तुम्हा सर्व लोकांचे प्रेम. मला शोचा सार्वजनिक विजेता बनवल्याबद्दल आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.'
दरम्यान, तेजस्विनीचा हात फ्रॅक्टर झाला नसून तिच्या उजव्या हाताच्या चौथ्या बोटाला बेटाकार्पलजवळ एक क्रॅक आलाय. त्यामुळे ती बोट आणि हात जास्त हालवू शकत नाही. हाताची जास्त हालचाल होऊ नये म्हणून संपूर्ण हातालाच प्लास्टर केलं आहे. डॉक्टरांनी तिला हाताची हातचाल करण्यास मनाई केलीये. अजून दोन आठवडे तिला हे प्लास्टर ठेवावं लगाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment