मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पहिल्या 3 सीझनपेक्षाही हटके आहे Bigg Boss Marathi 4 चं टायटल साँग; पाहिलंत का तुम्ही?

पहिल्या 3 सीझनपेक्षाही हटके आहे Bigg Boss Marathi 4 चं टायटल साँग; पाहिलंत का तुम्ही?

बिग बॉस मराठी 4चं धमाकेदार टायटल साँग रिलीज झालं आहे.  तुम्ही पाहिलं नसेल तर लगेच पाहा.

बिग बॉस मराठी 4चं धमाकेदार टायटल साँग रिलीज झालं आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर लगेच पाहा.

बिग बॉस मराठी 4चं धमाकेदार टायटल साँग रिलीज झालं आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर लगेच पाहा.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 22 सप्टेंबर :  प्रेक्षक गेली अनेक दिवस ज्या शो ची आतुरतेनं वाट पाहत आहेत तो बिग बॉस मराठी 4 येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेते महेश मांजरेकर बिग बॉस मराठीचा चौथा सीझन होस्ट करणार आहेत. हा सीझन इतर सीझनपेक्षा वेगळा असेल  यात काही शंका नाही.  100 दिवसांचा खेळ येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. स्पर्धकांप्रमाणे प्रेक्षकही शो सुरू होण्याची वाट पाहत आहेत. घरात येणारे अतरंगी कलाकार त्यांची भांडणं यामुळे शोला वेगळं रुप मिळतं. त्याहून सर्वात मोठं आकर्षण असतं ते म्हणजे बिग बॉसचं घर. शो सुरू झाल्यावर बिग बॉसच घर तर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेच पण त्याआधी स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकांनाही उत्साह वाढवणारं बिग बॉसचं हटके टायटल साँग. येस बिग बॉस मराठी 4 चं टायटल साँग नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बिग बॉस मराठीचं यंदा ऑल इज वेल हे सांगणारं टायटल साँग खास प्रेक्षकांसाठी रिलीज केलं आहे. मनोरंजनाचा खजिना खुलणार आणि 100 दिवसांचा खेळ 2 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. मात्र शो सुरू होण्यासाठी 9 दिवस शिल्लक असताना लाडक्या बिग बॉसचं गाणं रिलीज झालं आहे.
हेही वाचा - Bigg Boss Marathi मधील 'हे' लव्हबर्ड्स आठवतात का? एका विरुद्ध झालेली अश्लील वर्तनाची तक्रार बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड प्रिमीयर 2 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहे. आधीच्या 3 सीझनपेक्षा चौथ्या सीझनचं टायटल साँग फारच हटके आहे. महेश मांजरेकर देखील चावडीवर स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.  'चटर पटर चटर पटर बस्स झाली भाऊ',  म्हणत महेश मांजरेकरांनी जबरदस्त कमबॅक केलं आहे. प्रेक्षकांनाही गाणं आवडलं असून प्रेक्षकही धमाकेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी 4 चं टायटल साँग ऐकून तिसऱ्या सीझनचा बेस्ट प्लेअर उत्कर्ष शिंदेनं कमेंट करत, 'ये बात हंगामा सुरू', असं म्हटलं आहे. तर एका युझरनं, 'या राड्याची खूप वाट पाहिली', असं म्हटलंय. दुसऱ्या युझरनं 'हा सीझन हिंदीला टक्कर देईल', असं म्हटलं आहे.
First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या