मुंबई, 26 नोव्हेंबर : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांची एंट्री होऊन आता 50 दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत सदस्यांनी अनेक टास्क खेळले, एकमेकांशी भांडणं केली, शाब्दिक चमकमी झाल्या. पण आता 50 दिवसांनी सदस्यांची घरात राहण्यासाठी होणारी चुरस त्यांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. जिंकण्याच्या उद्देशानं सदस्य कोणाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. या सदस्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात आज एक टास्क रंगणार आहे. यादरम्यान सदस्य आपल्या जवळच्या माणसांनाच कचरा सिद्ध करणार आहेत.
बिग बॉसच्या घरात आज काय होणार त्याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यानुसार घरात आज "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हा टास्क रंगणार आहे. यामध्ये स्पर्धकांना त्यांच्या वर इतर कुठल्या स्पर्धकाचं ओझं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आहे. या दरम्यान काही धक्कादायक गोष्टी घडल्या. घरातील जिवलग मित्रांनीच एकमेकांना कचरा ठरवलं आहे.
हेही वाचा - BB16:बिग बॉसच्या घरात राडा; अर्चनाच्या एका चुकीची सगळे भोगणार शिक्षा
घरातील अमृता धोंगडे आणि तेजस्विनीची मैत्री सर्वानाच माहिती आहे. पण काही काळापूर्वी त्यांच्यात दुरावा आला आहे. आता त्यांच्यातील रुसवा वाढणार असून तेजू अमृताला कचऱ्याच्या डब्यात स्थान देणार आहे. व्हिडिओमध्ये तेजू म्हणते कि, ''मला खूप जवळच्या मैत्रिणीचं इमोशनल ओझं वाटत आहे सध्या, मला ते माझ्या खांद्यावरून काढायचंय.' तेजूचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर याच टास्कमध्ये विकास अपूर्वाला तर किरण माने विकासाला कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहेत.
View this post on Instagram
या टास्कमुळे सदस्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे. दरम्यान या आठवड्याच्या चावडीमध्ये स्पर्धकांनी आठवडाभर केलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची शाळा महेश सर घेत आहेत. कालच्या चावडीवर महेश सरानी प्रसादाचं कौतुक केलं. प्रसाद कधीही कोणाच्या पाठी बोलत नाही, जे आहे ते तोंडावर बोलतो म्हणून महेश सरांनी प्रसादची पाठ थोपटली. तर याचवेळी अपूर्वा आणि अक्षय सतत प्रसादविषयी मागे बोलत असतात म्हणून महेश सरांनी त्यांची शाळा घेतली. त्याचबरोबर शनिवारच्या चावडीवर मांजरेकरांनी अमृता धोंगडेला खडे बोल सुनावले आहेत. 'मॅडम धोंगडेंनी तर उच्छाद मांडलाय आठवडाभर. त्यावर अमृता स्वतःचं मत मांडत असताना महेश सर तिला 'मला त्याची पर्वा नाही.'असं सुनावलं आहे. आता या आठवड्यात या स्पर्धकांमधून घरातून बाहेर कोण पडणार ते पाहून महत्वाचं ठरणार आहे.
बिग बॉसच्या घरातील 50 दिवस पूर्ण झालेत. 50 दिवसांनी घरात वाइल्ड कार्ड एंट्री होते. पण घरात आधीपासूनच स्नेहलता वसईकरची वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री झाली आहे.आता पुन्हा घरात नवीन स्पर्धक येणार आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दोन नाही तर तब्बल चार स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहेत. आजच्या भागात या स्पर्धकांचे चेहरे समोर येणार आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.