मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rohit and Ruchira : 'अनफॉलो केलं याचा अर्थ...'; अखेर रोहितने रुचिरासोराबतच्या नात्यावर सोडलं मौन

Rohit and Ruchira : 'अनफॉलो केलं याचा अर्थ...'; अखेर रोहितने रुचिरासोराबतच्या नात्यावर सोडलं मौन

रोहित रुचिरा

रोहित रुचिरा

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच रोहित अखेर रुचिरासोबतच्या नात्यावर मौन सोडलं आहे. काय म्हणाला आहे तो पाहा...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, o6 डिसेंबर : बिग बॉस मराठी चौथ्या पर्वाची सध्या चांगलीच चर्चा आहे. जसे दिवस सरत आहेत तसा खेळ अधिकाधिक रंगत चालला आहे.  घरातून मागच्या आठवड्यात रोहित शिंदे घराबाहेर पडला.  बिग बॉस मराठीच्या घरात एकत्र एंट्री घेतलेलं पाहिलं जोडपं म्हणजे रुचिरा आणि रोहित होते. आता दोघेही घराबाहेर पडले आहेत. रुचिराने घराबाहेर येताच रोहितला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याने दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. आता घराबाहेर पडताच रोहितने देखील याविषयी मोठं भाष्य केलं आहे. नुकतंच त्याने अखेर रुचिरासोबतच्या नात्यावर मौन सोडलं आहे.

बिग बॉस मराठीच्याघरातून बाहेर निघताना रुचिरा आणि रोहित यांच्याच काही वाद झाले. ज्यानं रुचिरा नाराज होती. घराबाहेर पडताना देखील तिनं 'रोहितला बाहेर आल्यावर बोलू तुला माहिती आहे रुचिरा काही विसरत नाही', असं म्हटलं. यावरून दोघांमध्ये वाद झालेत हे लक्षात आलं. तर घराबाहेर येताच रुचिरानं रोहितला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं. यावरून बिग बॉसमुळे रोहित रुचिराच्या नात्यात दुरावा आलाय का? त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला. मात्र अखेर आता रोहितने भाष्य केले आहे. रोहित शिंदेने नुकतंच NEWS18लोकमतशी संवाद साधताना सविस्तर उत्तर दिले.

हेही वाचा - Rohit Shinde: बिग बॉसमधून आऊट झालेला डॉ. रोहित शिंदे नक्की कोणता डॉक्टर आहे? समोर आल्या डिटेल्स

या मुलाखतीत जेव्हा रोहितला दोघांच्या नात्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला कि, ''अनफॉलो फॉलो हे तितकं महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही. जरी तिने मला अनफॉलो केलं असेल तर तिने तिच्या जीवनातून एखाद्या माणसाला अनफॉलो केलं असं होत नाही. अनफॉलो करण्याचे कारण कदाचित एखादा ताण वैगरे असू शकतो. तसेच तिला तिचा वेळ हवा असेल त्यामुळे तिने असं केलं असेल. ''

पुढे तो म्हणाला कि, ''कारण अनेकदा त्याच त्याच गोष्टी सारख्या सारख्या समोर येत असतात. आपण हल्ली इन्स्टाग्राम सर्वात जास्त पाहतो. इन्स्टाग्रामवर सतत तेच तेच येणं, माझ्याबद्दल पोस्ट येत असतील ज्यामुळे तिला त्रास झाला असेल. कदाचित तिला कुठेतरी शांतता हवी असेल, म्हणून तिने ते केलं असावं. तिच्याजागी जर मी असतो तर कदाचित मी देखील हेच केलं असतं. अनफॉलोचे रुपांतर फॉलोमध्ये करायला जास्त वेळ लागत नाही. ते प्रेम आहे. त्यामुळे लवकरच सर्व गोष्टी सुरळीत होतील.'' अशा भावना रोहित शिंदेने यावेळी व्यक्त केल्या आहेत.

तसंच  या दोघांच्या भांडणाविषयी NEWS18लोकमतशी संवाद साधताना रुचिरा म्हणाली होती कि, ''प्रेम आणि गेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि रुचिराला या दोन गोष्टी वेगळ्या ठेवता येतात. तिने प्रेमात गेम नाही आणला. खेळात तिनं प्रेम जपलं. या दोन गोष्टी मी नक्कीच वेगळ्या ठेवू शकते. तसंच ज्या गोष्टी अनसॉर्ट आहेत त्या मी नेहमीच संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. घरात जे काही झालं त्याचा मी विचार करेनच पण आता मी माझा विचार करेन. आता मी बाहेर आल्यानंतर मला स्वत:ला जपायचं आहे. माझी प्रायोरिटी मी स्वत:आहे.''

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment