मुंबई, 05 डिसेंबर : बिग बॉस मराठी 4च्या घरात सध्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांमुळे खेळ चांगलाच रंगला आहे. राखी सावंत, मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर आणि विशाल निकम यांनी घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेत खेळाचा पॅटर्नच बदलून टाकला. मागच्या आठवड्यात विशाल आणि मीरा यांनी घरातून एक्झिट घेतली. मात्र राखी आणि आरोह घरात कायम आहेत. त्यातही राखीचा घरातील हैदोस कामय आहे. प्रसादवर राखीचा निशाणा साधणं काही कमी झालेलं नाही. यावेळी तर राखी प्रसादबरोबर थेट फ्लर्टिंग करताना दिसली. राखीचं वागणं पाहून प्रसादनं थेट राखीचे पायच धरलेत. दोघांचा घरातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात गार्डन एरिआमध्ये सगळे स्पर्धक गप्पा मारत बसलेले असताना अचानक राखी येते आणि तिचा स्टाइलनं हंगामा करायला सुरूवात करते. इतके दिवस राखी प्रसादबरोबर भांडत होती,त्याच्याशी गप्पा मारत होती पण यावेळी राखीनं प्रसादशी फ्लर्ट करत थेट त्याच्यावर अंगावरच धाव घेतली.
हेही वाचा- Shiv Thakare : अन् बिग बॉसचं घर गाजवणारा शिव ठाकरे ढसाढसा रडायला लागला; काय झालं नक्की?
View this post on Instagram
प्रसाद, अपूर्वा, अमृता देशमुख आणि स्नेहलता गार्डनमध्ये चहा पित बसलेले असताना राखी तिथे येते आणि हाय कसे आहात सगळे म्हणत थेट प्रसादच्या मांडीवर जाऊन झोपते आणि क ख ग शिकवं मला असं म्हणते. राखीच्या या अचानक विचित्र वागण्यानं प्रसाद गडबडून जातो. राखीचं म्हणणं ऐकून प्रसाद म्हणतो, ए... म्हणजे.... माझी आई... राखी मी तुझ्या पाया पडतो, म्हणत तिच्या पाया पडतो. त्यावर राखीला त्याला तुझ्या हृदयात काय झालं धकधक करने लगा क्या? असं विचारते. त्यावर त्याच्या हृदयातील घोडा धावायला लागला म्हणत अक्षय आणि इतर सदस्य प्रसादची खिल्ली उडवतात.
या सगळ्यावर प्रसाद राखीला म्हणाला, आज दहन करणारच आहे मी. त्यावर अमृता देशमुख म्हणाली, कितना अच्छा मौका था यार. यावर प्रसाद म्हणाला, हिच्या अंगावर पड. यावर राखी हसत हसत म्हणाली, मी मुलींच्या अंगावर नाही पडत. घरातील राखीचा हा ड्रामा पाहून अपूर्वा आणि स्नेहलता आणि इतर सदस्य चांगलेच हैराण झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news