मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'काय गं ये...'; जेव्हा राखीला दम द्यायला Bigg Bossच्या घरात नाना पाटेकर येतात; पाहा VIDEO

'काय गं ये...'; जेव्हा राखीला दम द्यायला Bigg Bossच्या घरात नाना पाटेकर येतात; पाहा VIDEO

राखी सावंत

राखी सावंत

राखी सावंतनं बिग बॉसच्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राखीला दम द्यायला थेट नाना पाटेकरांनी घरात एंट्री घेतलीये? व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  03 डिसेंबर : बिग बॉस मराठी 4च्या घरात सध्या फुल्ल टू धम्माल सुरू आहे. घरात आलेल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी चांगलीच धम्माल उडवून दिली आहे. अभिनेत्री राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर आणि मीरा जगन्नाथ यांनी खरात एंट्री घेतलीये. त्यातही राखी घरात चांगलाच गोंधळ घालताना दिसत आहे. राखापासून सगळेच चार हात लांब राहताना दिसत आहे. अशात प्रसाद आणि  राखी यांच्यात चांगलीच मैत्री झाली आहे. दोघे एकमेकांबरोबर मस्ती करताना दिसतात. आपल्या बोलण्यानं आणि पंचेसनं राखी घरात हैदोस घातल असते. अगदी उठण्यापासून ते मेकअप करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये राखीची काही  ना काही मज्जा सुरू असते.  अशा या राखीला धाक दाखवणार कोण तर त्यासाठी थेट नाना पाटेकरांनी घरात एंट्री घेतली आहे.

घरात आलेल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांना पहिल्याच आठवड्यात चँलेर्जंर्स बनवलं होतं. त्यामुळे घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. राखीनं तिला वाटेल ती शिक्षा स्पर्धकांना दिली. स्पर्धकांची खिल्ली उडवली त्यांच्याबरोबर वादही घातले. राखीच्या या स्वभावाला सगळे स्पर्धक चांगलेच वैतागलेत पण बोलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. अशातच नानांनी राखीची चांगलीच शाळा घेतली.

हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: 'तेजस्विनीला झालेली दुखापत साधी सुधी नाही'; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

आता तुम्ही म्हणाला घरात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची एंट्री झाली का? तर असं नाहीये. प्रसाद थेट नानांच्या आवाजालाच घरात घेऊन आला. प्रसाद नानांची दमदार मिमिक्री करतो हे आपण आधीही पाहिलं आहे. त्यामुळे राखीशी गप्पा मारता मारता प्रसादनं अचानक नानांचं रुप घेतलं सगळ्यांचा जाच करणाऱ्या राखीला नाना स्टाइलमध्ये सुनावलं.

प्रसादनं नानांची मिमिक्री करत राखीला म्हटलंय, 'अग काय बोलू, कसं बोलू मराठीत. काय गं ये राखी. काय करतेयस तू इथे येऊन? नुसती भांडणं लावतेस इकडे तिकडे. समजतेस कोण तू स्वत:ला ? आणि या मीराला बाजूला घेऊन काय करतेस? चार चार तास मेकअप करतेस. काय करायचं बाकिच्यांनी'.

प्रसादच्या या मिमिक्रीनं राखीला राग येण्यापेक्षा ती यावर पोट धरून हसायला लागली.  प्रसाद जवादेच्या सोशल मीडियावर हा धम्माल व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. 'बिग बॉसच्या घरातील सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे 2 सदस्य', असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial