मुंबई, 07 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त शो 'बिग बॉस' कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या सोशल मीडियावरही 'बिग बॉस मराठी 4' चा गाजावाजा पहायला मिळतोय. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला असून प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर ते आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. अशातच बिग बॉसच्या आजच्या भागाचा प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. आता घरात अमृता धोंगडे आणि प्रसाद मध्ये चांगलाच राडा होणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात बिग बॉस हायस्कुल भरणार असून काही सदस्य विद्यार्थ्यांच्या भूमिकेत तर काही शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच टास्कमध्ये आज अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा होणार आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या दोघांमध्ये भांडण लागायचं कारण म्हणजे त्याचे कारण म्हणजे प्रसादने टास्कमध्ये अमृताला नापास केले. त्यामुळे अमृता चांगलीच चिडली.
हेही वाचा - Jacqueline Fernandez : कोण होतीस अन् काय झालीस! जॅकलिनच्या जुन्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
अमृता प्रसादच्या अंगावर धावून जात म्हणाली, ''इथे समजते कोणाची बुद्धी किती आहे... थुकतील तुझ्यावर... आधी वाचायचं मग बोलायचं.'' त्यावर तिला उत्तर देत प्रसाद म्हणाला ''अंगावर येऊ नकोस... नॉन सेन्स नको वागूस.'' त्यावर अमृता प्रसादला 'बधिर आहेस तू' असं म्हणाली. हा वाद एवढा वाढला कि, त्यांच्यातील हा वाद सोडवायला इतर स्पर्धकांना देखील मध्ये पडावं लागलं. त्यामुळे यांचं भांडण कोणतं रूप घेणार ते आजच्या भागात समोर येईल.
View this post on Instagram
बिग बॉस मराठी 4च्या घरात सध्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांमुळे खेळ चांगलाच रंगला आहे. राखी सावंत, मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर आणि विशाल निकम यांनी घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेत खेळाचा पॅटर्नच बदलून टाकला. त्यातील मागच्या आठवड्यात विशाल आणि मीरा यांनी घरातून एक्झिट घेतली. मात्र राखी आणि आरोह घरात कायम आहेत. त्यातही राखीचा घरातील वावर चांगलाच गाजतो आहे. आता आज घरात किरण माने, विकास आणि राखी झालेल्या प्रकारावर चर्चा करताना दिसणार आहेत.
ज्यामध्ये किरण म्हणाले, 'अमृता धोंगडे नक्कीच प्रसादला नापास करणार.' राखी म्हणाली, तुम्हांला जे खतरनाक आहेत दोन. अक्षयला तुम्ही दुसरी संधी नाही देऊ शकणार... सारखा तो कॅप्टन नाही होणार आणि अपूर्वा. किरण म्हणाले, अक्षय - अपूर्वा टार्गेट वर ठेवायचे. विकास म्हणाला, मी एक करणार त्याने मुद्दा वाढणार. किरण आणि राखी म्हणाली, आज त्यांचे खरे रुप कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.