मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi 4 : 'अशी सणकन् देईन ना ठेऊन...' अक्षय आणि प्रसाद मध्ये पेटलं कडाक्याचं भांडण

Bigg Boss Marathi 4 : 'अशी सणकन् देईन ना ठेऊन...' अक्षय आणि प्रसाद मध्ये पेटलं कडाक्याचं भांडण

बिग बोस मराठी 4

बिग बोस मराठी 4

बिग बॉसच्या आजच्या भागाचा प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. आता घरात अक्षय केळकर आणि प्रसाद मध्ये कडाक्याचं भांडण होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 08 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त शो 'बिग बॉस' कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या सोशल मीडियावरही 'बिग बॉस मराठी 4' चा गाजावाजा पहायला मिळतोय. ‘बिग बॉस मराठी’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत  चालला असून प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर ते आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. अशातच बिग बॉसच्या आजच्या भागाचा प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. आता घरात अक्षय केळकर आणि प्रसाद मध्ये कडाक्याचं भांडण होणार आहे.

बिग बोस मराठीचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्या प्रोमोनुसार अक्षय केळकर आणि प्रसादमध्ये आज घरात चांगलाच राडा होणार आहे. या दोघांमध्ये जेवणावरून वाद होणार आहेत. प्रसाद आधी अक्षयला म्हणतो, ''स्वतः जेवलायस ना मग आमच्या भूमिकेचं काय करणार आहेस.' त्यावर अक्षय त्याला उलट उत्तर देत म्हणतो, ''कॅप्टन काय जेवायला बनलेलास का?' तेवढ्यात अक्षय म्हणतो 'याला घेऊन जा रे' हे ऐकून प्रसाद जास्तच चिडतो आणि म्हणतो, ''तुझ्या बापाचा नोकर आहे का तो''

हेही वाचा - Mira Jagannath : बिग बॉस मधून बाहेर पडताच मीरा जगन्नाथने स्वतःसाठी खरेदी केली 'ही' गोष्ट; सोशल मीडियावर एकच चर्चा

आता हे ऐकून अक्षय त्याच्या अंगावर धावून जातो आणि यांचं भांडण जास्तच पेटत. प्रसाद त्याला पुढे म्हणतो ,''माझ्यावर हात उचललास  तर पुढे हात उचलायच्या लायकीचा राहणार नाहीस. सणकून मारेन तुला अशी.' असं म्हणत दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जातात. यांचं भांडण एवढं वाढलं कि घरातील इतर सदस्यांना सुद्धा त्यांना सोडवायला मध्ये पडावं लागलं.  त्यामुळे यांचं भांडण कोणतं रूप घेणार ते आजच्या भागात समोर येईल.

दरम्यान काल बिग बॉस मराठीच्या घरात बिग बॉस हायस्कुल भरलं होतं. त्यात काही सदस्य विद्यार्थ्यांच्या भूमिकेत तर काही शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच टास्कमध्ये आज अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा झाला होता.  या दोघांमध्ये भांडण लागायचं कारण म्हणजे  त्याचे कारण म्हणजे प्रसादने टास्कमध्ये अमृताला नापास केले. त्यामुळे अमृता चांगलीच चिडली. त्यांचा वाद देखील टोकाला गेला होता.

बिग बॉस मराठी 4च्या घरात  सध्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांमुळे खेळ चांगलाच रंगला आहे. राखी सावंत, मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर आणि विशाल निकम यांनी घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेत खेळाचा पॅटर्नच बदलून टाकला.  त्यातील मागच्या आठवड्यात विशाल आणि मीरा यांनी घरातून एक्झिट घेतली. मात्र राखी आणि आरोह घरात कायम आहेत. त्यातही राखीचा घरातील वावर चांगलाच गाजतो आहे. आता आज घरातील दोघांमधलं हे भांडण किती वाढणार ते येणाऱ्या भागात समोर येईल.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Marathi entertainment