मुंबई, 28 नोव्हेंबर : बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांनाही मोठं सप्राइज मिळालं आहे. घरात चार सदस्यांची एंट्री झाली आहे. हिंदी बिग बॉस गाजवलेली राखी सावंतीसह बिग बॉस मराठी 3चा विजेता विशाल निकम तसंच अरोह वेलणकर आणि मीरा जगन्नाथ हे कलाकारही स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. चौघांच्या ग्रँड एंट्रीनं घरातील वातावरण आणि खेळाची रंगत आणखी वाढली आहे. घरात आलेल्या या 4 चॅलेंजर्सना इतर 11 सदस्यांना समोरं जायचं आहे. घरात जाताच आता मीरा जगन्नाथनं खेळाला सुरूवात केली आहे. मीरानं तिच्या स्टाइलनं काही सदस्यांना साइडला घेऊन तिचा गेम ऑन केला आहे. पहिल्या दिवशी मीरा थेट अक्षयला सल्ला देताना दिसणार आहे.
घरात अक्षय आणि प्रसाद यांच्यात चांगलीच ठसण पाहायला मिळतेय. प्रसादचा गेम घरात कुणालाच कळत नाहीये. त्याचं वागणंही सगळ्यांच्या डोक्यात जाताना दिसत आहे. अशातच आता मीरानं आल्या आल्या अक्षय आणि प्रसादला टार्गेट केल्याचं म्हणावं लागेल. प्रसादशी कसं वागायला हवं हे सांगताना मीरा दिसणार आहे.
हेही वाचा - BBM4 : प्रसादचं कौतुक तर अपूर्वा आणि अक्षयला खडे बोल; चावडीवर मांजरेकरांनी मांडला आठवड्याचा हिशेब
मीरानं घरात गेल्या गेल्या अक्षयला स्ट्रॅटेजी सांगितली. गार्डन एरिआमध्ये मीरा अक्षयला सांगतेय, 'त्याला इरिटेट करा. कारण अशानं त्याच्या आतला प्रसाद बाहेर येईल. तो बोलला वगैरे यापेक्षा त्याच्या तोंडावर बोल आणि त्याला इरिटेट कर. तो जे काही सिंम्पथी घेऊन बसतो आहे ते कमी होईल. त्याचं फस्टट्रेशन कमी होईल. तो जर एक एक पिल्लू मध्येच सोडत आहे तर तू पण त्याच्याबरोबर लढ ना. त्याला सांग तोंडावर बोल. असं हळू हळू बोलू नकोस'.
त्यावर अक्षय म्हणाला, 'नको पहिल्या आठवड्यात आम्ही हे केलं पण त्याने आम्हीच इरिटेट झालो. त्यामुळे असं करण्याची काही गरज नाहीये. जेव्हा केव्हा बोलायचं आहे तेव्हा बोललो आहे आणि बाकीचं स्किप केलं आहे. आम्ही आमच्यातही चर्चा केलेली लोकांना पटत नाही. त्यामुळे जे आवडत नाहीये ते स्किप करायचं'.
तसंच मीरानं घरात गेल्यावर कसं वागायचं आहे हे देखील ठरवलं आहे. आतमध्ये माझ्याशी लोक जसे वागतील तशी मी त्यांच्याशी वागेन, असंही मीरा म्हणाली आहे. आता घरात गेलेल्या या चौघांमुळे काय घडणार हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news