मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BBM4 : प्रसादचं कौतुक तर अपूर्वा आणि अक्षयला खडे बोल; चावडीवर मांजरेकरांनी मांडला आठवड्याचा हिशेब

BBM4 : प्रसादचं कौतुक तर अपूर्वा आणि अक्षयला खडे बोल; चावडीवर मांजरेकरांनी मांडला आठवड्याचा हिशेब

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4

प्रेक्षकांना आतुरता असते ती महेश सरांच्या आठवड्याच्या चावडीची. आज होणाऱ्या महेश सरांच्या चावडीवर नक्की काय होणार याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  26 नोव्हेंबर : बिग बॉस मराठीच्या घरात  सदस्यांची एंट्री होऊन आता 50 दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत सदस्यांनी अनेक टास्क खेळले, एकमेकांशी भांडणं केली, शाब्दिक चमकमी झाल्या. पण आता 50 दिवसांनी सदस्यांची घरात राहण्यासाठी होणारी चुरस त्यांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. जिंकण्याच्या उद्देशानं सदस्य कोणाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. प्रेक्षकांना आतुरता असते ती महेश सरांच्या आठवड्याच्या चावडीची. या चावडीमध्ये स्पर्धकांनी आठवडाभर केलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची शाळा महेश मांजरेकर घेतात. अशातच आज होणाऱ्या महेश सरांच्या चावडीवर नक्की काय होणार याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर चावडीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की महेश सर सगळ्यांच्या आठवड्याभराच्या वागण्याची शाळा घेत आहेत. मागच्या आठवड्यात घरात अमृता धोंगडेंने  जेल तोडले तर रोहित आणि विकासाला जेलची हवा खायला लागली. तर अपूर्वाने सुद्धा घरात चांगलाच राडा केला. आता या सगळ्यांना मांजरेकर फटकारताना दिसत आहेत.

हेही वाचा - Bigg boss marathi 4: अपूर्वा अन् विकासची जोडी जमली; ‘उह लाला’ गाण्यावर दिसला रोमॅंटिक अंदाज

व्हिडिओमध्ये मांजरेकरांनी आधी प्रसादाचं कौतुक केलं. प्रसाद कधीही कोणाच्या पाठी बोलत नाही, जे आहे ते तोंडावर बोलतो म्हणून महेश सरांनी प्रसादची पाठ थोपटली. तर याचवेळी अपूर्वा आणि अक्षय सतत प्रसादविषयी मागे बोलत असतात म्हणून महेश सरांनी  त्यांची शाळा घेतली आहे. महेश सर म्हणाले कि, 'तुम्ही दोघे पहिल्या दिवसापासून प्रसादविषयी बोलताय, त्याची मिमिक्री करताय, पण तो कधीच असं करत नाही. हा त्याचा चांगुलपणा आहे.'

त्याचबरोबर शनिवारच्या चावडीवर मांजरेकरांनी अमृता धोंगडेला खडे बोल सुनावले आहेत. 'मॅडम धोंगडेंनी तर उच्छाद मांडलाय आठवडाभर. त्यावर अमृता स्वतःचं मत मांडत असताना महेश सर तिला 'मला त्याची पर्वा नाही.'असं सुनावलं आहे. आता या आठवड्यात या स्पर्धकांमधून घरातून बाहेर कोण पडणार ते पाहून महत्वाचं ठरणार आहे.

तसंच या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून 2 सदस्यांना बाहेर पडावं लागणार आहे. बिग बॉसच्या घरातील 50 दिवस पूर्ण झालेत. 50 दिवसांनी घरात वाइल्ड कार्ड एंट्री होते. पण घरात आधीपासूनच स्नेहलता वसईकरची वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री झाली आहे.आता पुन्हा घरात नवीन स्पर्धक येणार आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दोन नाही तर तब्बल चार स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहेत.  उद्याच्या भागात या स्पर्धकांचे चेहरे समोर येणार आहेत.

First published:

Tags: Bigg boss marathi