मुंबई, 4 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त शो 'बिग बॉस' कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या सोशल मीडियावरही 'बिग बॉस मराठी 4' चा गाजावाजा पहायला मिळतोय. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला असून प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर ते आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. अशातच बिग बॉसच्या आजच्या भागाचा प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळे आज होणाऱ्या बिग बॉसच्या चावडीकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
कलर्स मराठीने आज होणाऱ्या चावडीचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दिसतंय की महेश मांजरेकरांनी घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे. कोणता सदस्य वजनदार आहे आणि कुठला सदस्य घरासाठी भार आहे, हे सदस्य ठरवणार आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या मताप्रमाणे दुसऱ्या सदस्याला वोट करतील. यावरुन घरात राडा तर पहायला मिळणारच. त्यामुळे घरातील वजनदार स्पर्धक कोण ठरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये दिसतंय की अपूर्वा आणि अमृतामध्ये या मुद्द्यावरुन बाचाबाची होते. त्यामुळे घरातील स्पर्धक कोणाला वजनदार आणि भार ठरणवतील हे आजच्या भागात कळेल. यासोबतच घरातील चावडीत महेश मांजरेकर कोणत्या सदस्यांचा क्लास घेणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. रोज घरात नवनवीव ट्विस्ट आणि टर्न पहायला मिळत आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक घरात आल्यापासून तर घरातील समीकरणं बदलेली दिसत आहे. त्यामुळे पुढचा घराबाहेर जाणार स्पर्धक कोण असणार? हाही प्रश्न प्रेक्षकांना आहेच.
दरम्यान, नुकतंच बिग बॉसच्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट झाली. तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घराबाहेर गेली आहे, तिला निरोप देताना स्पर्धकही खूप भावुक झाले होते. तेजस्विनीला प्रकृतिच्या कारणामुळे बाहेर जावे लागले असले तरी प्रेक्षकांनी ती परत येण्याची आशा आहे. तिला पुन्हा घरात बोलवा असं सोशल मीडियाद्वारे सांगतिलं जातंय. त्यामुळे आता तेजू पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार का? हा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment