मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BBM4 : बिग बॉसच्या घरात किरण माने पुन्हा घेणार एन्ट्री! स्पेशल पॉवर राहणार की जाणार?

BBM4 : बिग बॉसच्या घरात किरण माने पुन्हा घेणार एन्ट्री! स्पेशल पॉवर राहणार की जाणार?

‘बिग बॉस मराठी 4

‘बिग बॉस मराठी 4

किरण मानेंकडे बिग बॉसने मोठी सिक्रेट पॉवर दिली असून ते घरातील सदस्यांवर नजर ठेवू शकतात. पण आता पुन्हा एकदा घरात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे किरण माने पुन्हा एकदा घरात एंट्री घेणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 23 नोव्हेंबर :सोशल मीडियावर सर्वत्र एकच गाजावाजा पहायला मिळतोय तो म्हणजे 'बिग बॉस मराठी 4'. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला आहे. आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरातून सहा सदस्यांची एक्झिट झाली आहे. त्यामुळे पुढचा सातवा सदस्य कोण असणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी सध्या घरामध्ये मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. किरण मानेंकडे बिग बॉसने मोठी सिक्रेट पॉवर दिली असून ते घरातील सदस्यांवर नजर ठेवू शकतात. त्यांच्या मागे त्यांच्याविषयी कोण काय बोलतंय यावर त्यांचं लक्ष आहे. पण आता पुन्हा एकदा घरात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे किरण माने पुन्हा एकदा घरात एंट्री घेणार आहेत.

काल ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलेल्या हत्ती-मुंगीच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अमृता धोंगडे अधिक आक्रमक झालेली दिसली. या टास्कमध्ये हत्तीच्या गळ्यात घंटा बांधणारी टीम विजयी होणार होती. दोन्ही टीमला दोरी बांधलेली घंटा हत्तीच्या गळ्यात अडकवायची होती. परंतु, टास्कदरम्यान दोन्ही टीमने एकमेकांच्या घंटा बांधलेल्या दोऱ्या ‘बिग बॉस’च्या घरातील जेलमध्ये टाकल्या. त्यानंतर अमृता देशमुखने घरातील लांब काठीच्या साहाय्याने त्या दोऱ्या काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिग बॉसने घरातील प्रॉपर्टी न वापरण्याची ताकीद दिली.

हेही वाचा - Sajid Khan B’day: एकेकाळी जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता साजिद खान; 'या' कारणामुळे तुटलं नातं

अमृता धोंगडेने त्यानंतर आक्रमक रुप धारण करत दबंग स्टाइलने थेट बिग बॉसच्या घरातील जेल तोडण्याचा प्रयत्न केला. आधी अमृताने हाताने जेलचे खांब काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने लाथ मारुन जेल तोडले. अमृताने केलेल्या या चुकीची शिक्षा बिग बॉसने तिला टास्क संपल्यानंतर सुनावली. घरातील प्रॉपटीचे नुकसान केल्यामुळे बिग बॉसने अमृता धोंगडेची दोन आठवड्यांसाठी कॅप्टन्सी पदाची उमेदवारी रद्द केली आहे. त्यानंतर घरात अमृता रडताना दिसली होती. आता घरात किरण माने पुन्हा एंट्री घेणार आहेत. त्याचा सर्वात जास्त आनंद अमृताला होतो. पण तिचा हा आनंद फार काळ टिकणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

किरण माने घरात परत येताच अमृता, तेजस्विनी, प्रसाद त्यांना मिठी  व्यक्त करतात. अमृता धोंगडे आणि किरण मानेचं  नातं तर बाप लेकीचं आहे असं ते नेहमी म्हणतात. पण आता किरण माने तिला घरातील जागा दाखवून देणार आहेत. त्यांना परत येताच स्पर्धकांना रेटिंग द्यायचं टास्क बिग बॉसने दिलं  आहे.पण याचदरम्यान किरण माने सर्वात कमी रेटिंग अमृता धोंगडेला देतात. त्यामुळे ती चांगलीच दुखावली जाते. आणि किरण मानेंबद्दल नाराजी व्यक्त करते.

आता किरण मानेंनी घरात पुन्हा प्रवेश केला आहे. पण त्यांच्याकडे असलेली स्पेशल पॉवर राहणार कि जाणार हे पाहणं  महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment