मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi 4 ची पहिली स्पर्धक आली समोर; ओळखलं का या अभिनेत्रीला?

Bigg Boss Marathi 4 ची पहिली स्पर्धक आली समोर; ओळखलं का या अभिनेत्रीला?

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरची झलक समोर आली आहे. ज्यात दिसणारी अभिनेत्री कोण आहे याचा अचूक अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 29 सप्टेंबर : सध्या टेलिव्हिजनवर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी 4ची. येत्या 2 ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचं चौथ पर्व सुरू होत आहे. या पर्वात कोणते स्पर्धक दिसणार याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. स्पर्धकांचा चेहरा बिग बॉस मराठी 4 च्या 2 ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांसमोर येणारच आहे मात्र त्याआधी ग्रँड प्रीमियरची पहिली झलक समोर आली आहे. ज्यात बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे. अभिनेत्री बिग बॉसच्या घरातील दणक्यात एंट्री होणार आहे.

बिग बॉस मराठी 4च्या ग्रँड प्रीमियरचा प्रोमो समोर आला आहे ज्यात अभिनेत्रीचा बोल्ड लुक समोर आला आहे. ' मोहे अंग लगादे'  या गाण्यावर डान्स करत अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेत्रीनं प्रोमोमध्येच प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. पण घरात जाणारी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे काही कळू शकलेलं नाहीये. अभिनेत्रीचा चेहरा काही दिसत नाहीये. पण प्रेक्षकांनी मात्र ही अभिनेत्री कोण असावी याचा अचूक अंदाज लावला आहे.

हेही वाचा - Bigg Boss Marathi: 'भविष्यात मी बिग बॉसचा अँकर असेन'; अभिजीत बिचुकलेचं मांजरेकरांना चॅलेंज

बिग बॉस मराठी 4चा प्रीमियरचा प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रोमोमध्ये डान्स करत असलेली अभिनेत्री ही नेहा खान आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. नेहा खान म्हणजेच लोकप्रिय 'देवमाणूस' या मालिकेतील पोलीस ऑफिसर दिव्या सिंग. ही नेहा खानच असणार असं अनेक प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

नेहाला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वासाठी देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र तेव्हा मालिका सुरू असल्यानं नेहानं ऑफर नाकारली होती. पण ती चौथ्या पर्वात दिसणार आहे असं वाटतं आहे.

तर काहींनी हा प्रोमो पाहून ही समृद्धी जाधव असल्याचं म्हटलं आहे. समृद्धी जाधव ही सोशल मीडियावर सेलिब्रेटी आहे.  त्याचप्रमाणे ती मॉडेलही आहे. सोशल मीडियावर रिल्स आणि फोटोच्या माध्यमातून समृद्धी प्रसिद्ध झाली आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news