मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ruchira Jadhav: 'कोकण आणि ट्रेनचा प्रवास','बिग बॉस मराठी' फेम रुचिरा जाधवची पोस्ट चर्चेत

Ruchira Jadhav: 'कोकण आणि ट्रेनचा प्रवास','बिग बॉस मराठी' फेम रुचिरा जाधवची पोस्ट चर्चेत

रुचिरा जाधव

रुचिरा जाधव

BBM 4 Ruchira Jadhav: 'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन धमाकेदार ठरला. यातील स्पर्धकांना प्रचंड प्रेम आणि लोकप्रियता मिळाली आहे. यातीलच एक स्पर्धक म्हणजे रुचिरा जाधव होय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 1 फेब्रुवारी-  'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन धमाकेदार ठरला. यातील स्पर्धकांना प्रचंड प्रेम आणि लोकप्रियता मिळाली आहे. यातीलच एक स्पर्धक म्हणजे रुचिरा जाधव होय. शांत स्वभाव आणि दमदार खेळीच्या जोरावर रुचिराने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. बिग बॉसचा चौथा सीजन संपल्यानंतरसुद्धा रुचिरा सतत चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या रुचिरा आपल्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रुचिरा जाधव नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री यंदा बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे रुचिरा बॉयफ्रेंड रोहितसोबत घरामध्ये दाखल झाली होती. शोच्या मध्यंतरी रुचिरा घरातून बाहेर पडली होती. परंतु अभिनेत्रीने याकाळात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रुचिराचा एक खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहत्यांना नेहमीच तिच्या लहान-लहान गोष्टींबाबत जाणून घ्यायला आवडतं.

(हे वाचा: Prajakta Mali: 'मी साडे चार वर्षांपूर्वी...' डेटिंगबाबत प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा)

रुचिरा जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस फोटो आणि रील्सना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात.अभिनेत्रीने फोटो शेअर करताच व्हायरल होत असतात. दरम्यान रुचिराने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

रुचिरा जाधवने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती ट्रेनचा प्रवास करताना दिसून येत आहे. सांगायचं झालं तर रुचिरा आपल्या गावी म्हणजेच कोकणला पोहोचली आहे. त्याठिकाणी सुट्टी एन्जॉय केल्यानंतर मुंबईला परतताना आपल्या मनाची कशी घालमेल सुरु होती याबाबत अभिनेत्रीने सांगितलं आहे. शिवाय आपण फ्लाईटचं तिकीट कॅन्सल करत कसं ट्रेन प्रवासाला निवडलं याबाबतही सांगितलं आहे.

रुचिराने पोस्ट शेअर करत लिहलंय, 'कोकण आणि Train चा प्रवास म्हणजे Fav समीकरण…जाताना flight ने गेले. परत येताना सुद्धा flight ticket booked होतं. पण कोकणातून लगेच पाय निघत नव्हता….☺️#ruchirasays आपलं कोकण आहेच तसं, मग काय… cancelled my ticket… अजून एक दिवस राहिले आणि next day Train ने आले'. असं सांगत रुचिराने सर्वांचंच मन जिंकलं आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi actress, Marathi entertainment