मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Kiran Mane:'मला बघन्यासाठी..', किरण मानेंनी शेअर केला आजीबाईंचा भारावून टाकणारा VIDEO

Kiran Mane:'मला बघन्यासाठी..', किरण मानेंनी शेअर केला आजीबाईंचा भारावून टाकणारा VIDEO

किरण माने

किरण माने

Kiran Mane: 'बिग बॉस मराठी' चा चौथा सीजन नुकताच पार पडला. या शोमधून अनेक स्पर्धक-कलाकारांना एक नवी ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेते किरण माने होय. किरण मानेना या शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 1 फेब्रुवारी- 'बिग बॉस मराठी' चा चौथा सीजन नुकताच पार पडला. या शोमधून अनेक स्पर्धक-कलाकारांना एक नवी ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेते किरण माने होय. किरण मानेना या शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. बिग बॉसमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहते सतत किरण मानेंना भेटून त्यांना सोशल मीडियावरुन मेसेज करुन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात. किरण माने असेच काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. आजही त्यांनी असंच काहीसं केलं आहे. किरण माने याची नवी इन्स्टा पोस्ट चर्चेत आली आहे. पाहूया काय आहे नेमकी पोस्ट.

अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यात येत असलेले अनुभव किंवा घडत असलेल्या चांगल्या-वाईट घटना सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन दाद देत असतात. बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यांनतर त्यांचे चाहते सतत त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

(हे वाचा:Bigg Boss Marathi फेम जय दुधाणे-मीरा जगन्नाथ पुन्हा दिसणार एकत्र; समोर आला नवा प्रोजेक्ट )

नुकतंच किरण माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच आपल्या आजोळात आपलं स्वागत कसं झालं. आणि लोकांनी आपल्याला कसं प्रेम दिलं याबाबत सांगितलं आहे. दरम्यान आजोळात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने आपल्याला आपल्या नातवासारखी माया करत आपला लाड केला याचं भावुक विश्लेषण त्यांनी या पोस्टमधून केलं आहे.

किरण माने पोस्ट-

बिगबाॅस'मधलं या आज्जीला काय कळत नव्हतं... वय वर्ष ९५... फकस्त "माझ्या म्होरं ल्हानाचा मोट्टा झालेला किरन त्यात हाय" म्हनून रोज बिगबाॅस सुरू होताच मला बघन्यासाठी टीव्हीपुढं बसनारी ही नानुआज्जी ! माझ्या आजोळची, बारामतीजवळच्या कोर्‍हाळे बुद्रुक मधल्या मोरेवस्तीवर र्‍हानारी. मला बघताच तिला आनंदाचं भरतं आलं. "लै भारी खेळलास रं माझ्या राजा" म्हनत माझ्यावर मायेचा वर्षाव केला तिनं. खरंच मी लै भाग्यवान हाय असं मला वाटायला लागलंय.

रोज वेगवेगळ्या गांवात, घराघरात माझे सत्कार चाल्लेत. मी लै मोठं काहीही केलेलं नाय... पन मनोरंजनाच्या दुनियेत, माझ्या मातीतल्या मानसांना निखळ आनंद देनारं, अभिमान वाटनारं कायतरी घडलंय माझ्या हातनं एवढं नक्की ! आन् हीच भावना मला लै लै लै बळ देतीय. नवी उर्जा, नवी शक्ती घेऊन पुढच्या प्रवासाला सुरूवात करतोय'.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment