मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi 4 : लोकांनी हिणवलं पण त्याने भल्याभल्यांना नाचवलं; बिग बॉसमधील विकास सावंतची प्रेरणादायी गोष्ट

Bigg Boss Marathi 4 : लोकांनी हिणवलं पण त्याने भल्याभल्यांना नाचवलं; बिग बॉसमधील विकास सावंतची प्रेरणादायी गोष्ट

 विकास सावंत

विकास सावंत

बिग बॉसमध्ये प्रसिद्ध डान्सर विकास सावंत सहभागी झाला आहे. त्याचं विशेषत्व म्हणजे त्याची हाईट छोटी आहे. पण त्याने आजवर भल्याभल्याना त्याच्या तालावर नाचवलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 2 ऑक्टोबर : बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या कलाकार स्पर्धकांचे वाद, एकमेकांच्या काढल्या जाणाऱ्या उखाळ्या पाखाळ्या, कार्यक्रमातल्या टास्कमध्ये एकमेकांशी होणारी हाणामारी या सगळ्यामुळं हा कार्यक्रम अनेकदा वादग्रस्त ठरतो. तरी देखील या कार्यक्रमाची लोकप्रियता मालिकांइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक आहे. आता या चौथ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून कोण कलाकार सहभागी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आता प्रसिद्ध डान्सर विकास सावंत सहभागी झाला आहे. त्याचं  विशेषत्व म्हणजे त्याची हाईट छोटी आहे. पण त्याने आजवर भल्याभल्याना त्याच्या तालावर नाचवलं आहे.

विकास सावंत हा मूळ मुंबईचा आहे. त्याचं वय 29 वर्ष एवढा आहे.  त्याची उंची कमी आहे. पण त्याने स्वतःच्या जिद्दीवर आज चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. त्याने आजवर रणवीर सिंग, रितेश देशमुख या कलाकाराना डान्स शिकवलं आहे. त्याने आजवर अनेक रियालिटी शोमध्ये सहभागी होऊन नाव कमावलं आहे. त्याने त्याच्या अपंगत्वाला त्याची मोठी ताकद बनवलं आहे.

हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 : 'शेवंतामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं पण... '; 'बिग बॉस मराठी 4' स्पर्धक अपूर्वाविषयी या रंजक गोष्टी माहितेय का?

पण विकास सावंतची एक करुण  कहाणी आहे. लोकप्रिय होण्याआधी त्याला आयुष्यात मोठ्या संघर्षाला सामोरं  जावं लागलं आहे. त्याला कुठेच काम मिळत नव्हतं तेव्हा त्याने सर्कशीत काम करायला सुरुवात केली. त्याला लोक हिणवायचे, टोमणे मारायचे. पण त्याने त्याकडे लक्ष दिलं  नाही. आणि आपली मेहनत सुरु ठेवली. तो सर्कशीत जोकरचं काम करायचा. ते काम केलेलं त्याच्या वडिलांना आवडायचं नाही. पण लोकांना हसताना पाहून मला आनंद  व्हायचा अश्या भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

बिग बॉसमध्ये सहभागी होताच त्याने बोलून दाखवत नाही, करून दाखवायला आवडतं अशी भूमिका घेतली आहे. त्याने मंचावर येताच महेश मांजरेकरांना देखील नाचायला भाग पाडलं आहे. आता तो बिग बॉसच्या घरात किती जणांना नाचवणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

बिग बॉस कार्यक्रम आवडीनं पाहिला जातो. त्यामुळंच या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांच्याकडेंच सोपावण्यात आली आहे. आता या चौथ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून कोण कलाकार सहभागी होणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या  ग्रँड प्रीमियर नुकताच रिलीज झाला आहे. आता या पर्वामध्ये बहुरंगी स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामुळे यावेळचा सिझन नक्कीच रंजक ठरणार आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi