मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg boss marathi 4: अपूर्वा अन् विकासची जोडी जमली; ‘उह लाला’ गाण्यावर दिसला रोमॅंटिक अंदाज

Bigg boss marathi 4: अपूर्वा अन् विकासची जोडी जमली; ‘उह लाला’ गाण्यावर दिसला रोमॅंटिक अंदाज

 बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठीच्या घरात एक अवॉर्ड सोहळा रंगणार असून त्यात चक्क विकास आणि अपूर्वाचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 26 नोव्हेंबर :  बिग बॉस मराठीच्या घरात  सदस्यांची एंट्री होऊन आता 50 दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत सदस्यांनी अनेक टास्क खेळले, एकमेकांशी भांडणं केली, शाब्दिक चमकमी झाल्या. पण आता 50 दिवसांनी सदस्यांची घरात राहण्यासाठी होणारी चुरस त्यांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. जिंकण्याच्या उद्देशानं सदस्य कोणाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. आता मात्र घरातील स्पर्धक भांडणांनंतर एकत्र आलेले दिसून येणार आहेत. घरात एक अवॉर्ड सोहळा रंगणार असून त्यात चक्क विकास आणि अपूर्वाचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे.

‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टन्सी टास्कमध्ये सगळ्या स्पर्धकांनी राडा केला. हे टास्क संपल्यानंतर मात्र  घरात ‘बीबी अवॉर्ड शो’चा कार्यक्रम होणार आहे. या अवॉर्ड सोहळ्यात घरातील सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. तसेच घरातील सदस्यांना या सोहळ्यात वेगवेगळे अवॉर्डही दिले जाणार आहेत. याचा एक प्रोमो व्हिडीओ कलर्स मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा - Alia Ranbir Daughter : आलिया रणबीर अशी घेतायेत लेकीची काळजी; कोणाचीही मदत घेण्यास नकार

या प्रोमोवर ‘बिग बॉस’च्या घरातील अवॉर्ड सोहळ्यात अपूर्वा नेमळेकर व विकास सावंत यांनी ‘उह लाला’ या विद्या बालनच्या गाण्यावर रोमॅंटिक डान्स केला. या डान्सची झलक व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. डान्स संपल्यानंतर किरण माने विकास व अपूर्वाच्या मध्ये जाऊन बसल्यानंतर अपुर्वाने लगेच नाक मुरडल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या अवॉर्ड सोहळ्यात अपूर्वा व विकास हे यांच्या जोडीला मेड  फॉर इच अदर' या कॅटॅगिरी  अंतर्गत  ‘सर्वोत्कृष्ट धमाल जोडी’ हा पुरस्कार देण्यात आला. तर शो च्या शेवटी सगळ्या स्पर्धकांनी एकत्र बसून न भांडता एक छान फोटो काढला.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरातून आतापर्यंत 5 स्पर्धक बाहेर पडले आहेत.तर किरण माने घराच्या बाहेर पडूनही स्पेशल पॉवरमुळे घरात आहेत. दरम्यानच्या काळात बिग बॉसमध्ये स्नेहलता वसईकरने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. आता पुन्हा घरात नवीन स्पर्धक येणार आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दोन नाही तर तब्बल चार स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहेत. आजच्या आणि उद्याच्या भागात या स्पर्धकांचे चेहरे समोर येणार आहेत.

तसेच आठवड्याभरात घरात हत्ती आणि राणी मुंगीच्या टास्कमध्ये अमृता धोंगडेनं बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं केलेल्या नुकसानीमुळे अमृताला बिग बॉसनं कठोर शिक्षा दिली आहे. पण अमृतानं केलेल्या कृत्याचा धडा न घेता सदस्यांनी घरात पुन्हा एकदा नको ते पाऊल उचललं आहे. विकास आणि रोहित यांच्यात झालेल्या मारामारीमुळे आता बिग बॉसनं त्यांना जेलमध्ये टाकलं आहे. विकास आणि रोहित जेलमध्ये गेल्यानं घरात नवा ट्विस्ट आला. दरम्यान आता घरात आज आणि उद्या महेश सरांची चावडी रंगणार असून तिथे आठवड्याभरात घडलेल्या या गोष्टींचा हिशेब काढला जाणार आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Marathi actress, Marathi entertainment