• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Shocking Eviction :आला आणि गेलासुद्धा; बिग बॉस मराठीच्या घरामधून आदिश वैद्य बाहेर 

Shocking Eviction :आला आणि गेलासुद्धा; बिग बॉस मराठीच्या घरामधून आदिश वैद्य बाहेर 

वाइल्ड कार्डद्वारे (wild card contestant adish vaidya ) आलेल्या आदिश वैद्यला (Adish Vaidya) या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. यावेळी मीनल शाह भावुक झाली होती.

 • Share this:
  मुंबई, 24 ऑक्टोबर :  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3 )आता दर आठवड्याला एका सदस्याला घराबाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये मीनल शाह, विकास पाटील, संतोष चौधरी (दादुस) आणि आदिश वैद्य हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या चार जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. वाइल्ड कार्डद्वारे (wild card contestant adish vaidya ) आलेल्या आदिश वैद्यला (Adish Vaidya) या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. यावेळी मीनल शाह भावुक झाली होती. या आठवड्यातील बिग बॉसच्या चावडीमध्ये बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील दोन लोकप्रिय सदस्यांनी हजेरी लावली. बिग बॉस मराठी सीजनची पहिलची विजेती  मेघा धाडे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी रेशम टिपणीस या दोघी आज बिग बॉस मराठीच्या घरात दिसल्या. दोघींनी सदस्यांचे भरभरून कौतुक केले.  तर काही सदस्यांना ते कुठे चुकत आहेत ते देखील सांगितले. तसेच सदस्यांसोबत एक मजेदार गेमदेखील खेळल्या. उत्कर्ष आणि सोनाली पाटीलने बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. चुगली बूथद्वारे विशालला त्याच्या फॅनने सोनालीबद्दल चुगली केली. ज्यामुळे विशाल दुखावला गेला.
  आजच्या चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी केलेल्या कानउघडणीचा सदस्यांवर काही परिणाम होणार का ? कोण बनणार नवा कॅप्टन ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सीजन तीन कलर्स मराठीवर. वाचा : मानसी नाईकच्या Karwa Chauth स्पेशल फोटोवर 'या' व्यक्तीची खास कमेंट कोण आहे हा आदिश वैद्य ? विविध मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रसिद्ध असलेला आदिश हा आता बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेत असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे. 'गुम है किसीके प्यार में' या हिंदी मालिकेत आदिश सध्या महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र नुकतीच त्याने या शोमधून एक्झिट घेतल्याचं देखील समोर आल आहे. अदिश नेहमी रेवती लेलेसोबतच्या रिलेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. दोघेही एकमेंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
  Published by:News18 Trending Desk
  First published: