• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi 3 च्या घरातील 'या' सदस्याच्या निर्णयामुळे विशल निकमला अश्रू अनावर

Bigg Boss Marathi 3 च्या घरातील 'या' सदस्याच्या निर्णयामुळे विशल निकमला अश्रू अनावर

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

 • Share this:
  मुंबई, ४ ऑक्टोबर: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील (Shivleela Patil)   यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम (Vishal Nikam) , सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रू अनावर झाले. कालच्या भागातील शिवलीला पाटील यांच्या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य त्यांची आज मते मांडताना दिसणार आहेत. याचसोबत दोन दिवस रंगलेल्या या बिग बॉसच्या चावडीमध्ये काहींची कानउघडणी झाली, काहींना महेश मांजरेकर यांनी समजावून सांगितले आणि काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हे देखील दाखवून दिले. वाचा :  Big Boss Marathi 3: भली मोठी पोस्ट लिहीत; आदर्श शिंदेने घेतली चावडीचीच शाळा वूटद्वारे आलेल्या काही अतरंगी डिमांडसाठी जय आणि विशाल राजी झाले आणि जयने त्यामध्ये बाजी मारली. त्याचसोबत चुगली बूथद्वारे जयच्या फॅनने त्याला चुगली केली आणि विकास – विशाल काय म्हणाले हे उघड केले. बघूया या नव्या आठवड्यात कोण कोणाला भिडणार ? कोणते नवे टास्क रंगणार ? कोण बाजी मारणार ? कोणाच्या हाती हार येणार ? कोणाला मिळणार कॅप्टन बनण्याचा बहुमान ?
  शिवलीला यांच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावुक झाला. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणाला, “ ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर तो कधी नाही मोडणार. ते असतना काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे”... मीनलने देखील सांगितले, “ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे... तिच्यासारखी मुलगी मी कधीच नाही बघितली. तिला इतक नॉलेज आहे त्याच्यासमोर कोणीच काही नाही आहे.  आता पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठीचा सीजन तिसरा पाहावा लागणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: