मुंबई, 20 ऑक्टोबर: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3) कालपासून “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य सुरू आहे . काल टीम A पूर्णपणे जणू (Bigg Boss Marathi 3 latest episode) मीरा साठीच खेळत होती की काय असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला असेलच. मीनलची कॅप्टन बनण्याची इच्छा अपुरी राहिली कारण, उमेदवारीमधून ती बाहेर पडली. आदिश आणि मीरामध्ये काल उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली आणि ती ठरली कॅप्टन पदाची पहिली उमेदवार.
आज टीम A म्हातारी बनणार असून Team B म्हणजेच विशाल, सोनाली..... प्राणी बनणार आहेत म्हणजेच या टीमला भोपळे लपवायचे आहेत. आणि विकास Team A मध्ये असल्याने तो Team B सोबत कार्याची रणनीति आखताना दिसणार आहे, कारण कुठेतरी त्याला देखील कॅप्टन होण्याची इच्छा आहे.
View this post on Instagram
विकासचे म्हणणे आहे, “ दुसर्या राऊंडला आजीचे गाठोडे आहे ना ते उघडायचे आणि त्याच्यामध्ये भोपळा ठेवायचा, काल आम्ही पहिले ते उघडून... भोपळा ठेवला की, परत गाठोड आहे तिथे ठेवायचे. मी येणार डायरेक्ट गाठोड घेऊनच आत येणार. तिघांना बाहेर काढायचे आहे.
वाचा : ओळखलं का फोटोतील 'या' चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची लोकप्रिय गायिका
विशाल तुझं पहिलं काम जिथे जयचा टाकशील तिथे उत्कर्षचा टाकशील आणि तिथेच दादूसचा पण टाकशील. आपल्याला हे तीन लोकं बाहेर काढायची आहेत. हे तीन एकदा बाहेर गेले की मग ... पुढे मग खेळवा तुम्ही सगळ्यांना. कारणं तेव्हा फक्त मुली रहातील. काल जे ते करत होते ना, आपल्याला तितकं नाही करायचे पण... आणि पुढे अजून काही योजना आखल्या गेल्या. बघूया कोण बाजी मारते ते आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिजन तिसरा.
वाचा :Bigg Boss Marathi:आज्जीने काहींना दिला 'धम्मक लाडू' तर काहींना 'बेसन लाडू'
आता हा टास्क कोण जिंकतेय व कॅप्टन कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे कॅप्टन कोणत्या ग्रुपचा होणार यावर देखील घरातील पुढची गणित अवलंबून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi