Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi च्या घरातील जय-विरूची जोडी पुन्हा एकत्र ; नवीन प्रोजेक्टचं शुटिंग सुरू

Bigg Boss Marathi च्या घरातील जय-विरूची जोडी पुन्हा एकत्र ; नवीन प्रोजेक्टचं शुटिंग सुरू

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांना नवीन प्रोजक्ट मिळाले आहेत. यापैकी जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे यांना देखील एक प्रोजेक्ट मिळाला आहे.

  मुंबई, 19 जानेवारी- बिग बॉस मराठीचा तिसरा (Bigg Boss Marathi 3 )सीजन प्रचंड गाजला. यातील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. आजही प्रेक्षक या स्पर्धकांना विसरू शकलेले नाहीत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांना नवीन प्रोजक्ट मिळाले आहेत. यापैकी जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे यांना देखील एक प्रोजेक्ट मिळाला आहे. यामध्ये दोघे एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे या प्रोजेक्टला सुरूवात देखील झाली आहे. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. टीआरपी मराठी यांच्या इन्स्टा पेजने याबद्दल माहिती दिली आहे. जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदेचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटोमध्ये जयने लाल रंगाच कुर्ता घातला आहे तर उत्कर्ष नेहमीच्या लुकमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये जयच्या डोक्याला फेटा बांधताना एक व्यक्ती दिसत आहे. हे फोटो सेटवरील असल्याचे लक्षात येत आहेत. या नवीन प्रोजकेच्या शुटिंग सुरू झालं आहे. मात्र हा प्रोजेक्ट कोणता आहे याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र बिग बॉस मराठीच्या घऱातील ही जय विरूची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकत्र पाहता येणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुरेका कुडची यांनी कर्लस मराठीच्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे. तसेच स्नेहा वाघ हिला देखील नवीन प्रोजेक्ट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या घरानं अनेकांना ओळख याशिवाय काम देखील दिल आहे. या शोमळे अनेक कलाकारांना ओळख मिळाली. शिवाय घरात असतानाच जय दुधाणे याला महेश मांजरेकर यांनी सिनेमांची ऑफर दिली आहे. वाचा-क्यूटेस्ट कपल सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकरचे संक्रांतीचे स्वीटेस्ट फोटो बिग बॉस मराठीच्या घऱात काही मैत्रिचे बंध जोडले गेले. त्यापैकी विशाल निकम आणि विकास पाटील, मीनल शाह आणि सोनाली पाटील तसेच मीरा आणि गायत्री याशिवाय जय आणि उत्कर्ष यांच्या मैत्रिची घरात नेहमी चर्चा झाली. जयच्या प्रत्येक गोष्टीत मोठ्या भावाप्रमाणे उत्कर्ष नेहमी पाठिशी राहिला. घरातून बाहेर आल्यानंतर हे नात तसेच पाहायला मिळत आहे. आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या