मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss Marathi 3 : जय आणि मीनलमध्ये जेवणाच्या टेबलावर तुफान राडा ; प्लेट धुण्यावरून धमकवण्यापर्यंत गेली मजल

Bigg Boss Marathi 3 : जय आणि मीनलमध्ये जेवणाच्या टेबलावर तुफान राडा ; प्लेट धुण्यावरून धमकवण्यापर्यंत गेली मजल

Bigg Boss Marathi सुरू झाल्याला चार दिवस होत नाहीत तोच भांडणंही सुरू झाली आहेत. मीनल शहा आणि जय दुधाणे यांच्यात जेवणाच्या टेबलवर तुफान राडा झाला आहे. पाहा VIDEO

Bigg Boss Marathi सुरू झाल्याला चार दिवस होत नाहीत तोच भांडणंही सुरू झाली आहेत. मीनल शहा आणि जय दुधाणे यांच्यात जेवणाच्या टेबलवर तुफान राडा झाला आहे. पाहा VIDEO

Bigg Boss Marathi सुरू झाल्याला चार दिवस होत नाहीत तोच भांडणंही सुरू झाली आहेत. मीनल शहा आणि जय दुधाणे यांच्यात जेवणाच्या टेबलवर तुफान राडा झाला आहे. पाहा VIDEO

मुंबई, 24 सप्टेंबर 2021 ; सध्या सगळीकडे ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) सीजन तीनची चर्चा सुरू आहे. वादग्रस्त असणारा हा शो लोकप्रिय देखील तितकाच आहे. बिग बॉस म्हणटं की जोराचं भांडणही आलीच. आज देखील बिग बॉसच्या घरात मीनल शहा आणि जय दुधाणे यांच्यात जेवणाच्या टेबलवर तुफान राडा झाला आहे. मीनले जयला चल इथून निघ..अशी धमकी दिली आहे. यावरून जय देखील संतापला आहे.

प्लेट धुण्यावरून जय आणि मीनलच्यात हा वाद झाला आहे. सुरेखा कुडचीकर घरातील सदस्यांना आपली जेवण्याची प्लेट धुण्याचे सांगत असतात. यावरून मिनल म्हणते धुणार नाही. यावरून जय म्हणतो मग ठीक आहे आम्ही देखील तुमची कामे करणार नाही. यावरून दोघांच्याचात कडक्याचे भांडण झाल्याचे दिसत आहे. दोघही एकमेंकावर जोराने ओरडताना दिसत आहेत. घरातील सदस्य त्यांना शांत करताना दिसत आहे. दोघेही आग्रम होऊन एकमेंकांच्या अंगावर धावून गेले आहेत. आज रात्री कर्लस मराठीवर हा भाग पाहता येणार आहे.हा वाद मिटला का नाही, नेमके पुढे काय झाली याची प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली आहे.

वाचा : Bigg Boss Marathi 3 मध्ये अरुण गवळीच्या जावयाची चर्चा ; काय आहे दादा कोंडकेंशी कनेक्शन ?

बिग बॉस आणि वादाचे समीकरण जुने आहे. या घऱात सर्वात जास्त वाद हे जेवणावरून होत असती. मीराने देखील सुरूवातीला जेवणावरून घरात राडा घलला आहे. आणि आता जय आणि मीनलच्यात देखील प्लेट धुण्यावरून राडा झाला आहे. हा वाद नेमक घरात काय वातावरण तयार करणार हे आजच्या भागात समजणार आहे.

तसेच आता कॅप्टनशिपसाठी घरात चांगलीच चुरस रंगणार आहे. ही चुरस डॉ. उत्कर्ष शिंदे आणि मीरा जगन्नाथ यांच्यात होत आहे. हा टास्क खेळत असताना जय दुधाणे आणि मीरा यांच्यात जोराचे भांडण झाले. त्यामुळे हा टास्क पूर्ण झाला की नाही, या टास्कमध्ये कोण जिंकले आणि घरात पहिला कॅप्टन होण्याचा मान कुणाला मिळाला याची उत्सुकता देखील लागली आहे.

First published: