मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg boss marathi 3 Shocking Eviction : कोल्हापुरची लवंगी मिरची सोनाली पाटील OUT

Bigg boss marathi 3 Shocking Eviction : कोल्हापुरची लवंगी मिरची सोनाली पाटील OUT

बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन (bigg boss marathi 3) आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत.

मुंबई, 19 डिसेंबर- बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन (bigg boss marathi 3) आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडताना दिसत आहे. दरम्यान विशाल निकम हा मराठी बिग बॉसचा पहिला फायनलिस्ट ठरला आहे. आता या आठवड्यात घऱात बाहेर कोण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्रॉफीच्या जवळ येऊन असं एका आठवड्यासाठी घराच्या बाहेर पडणं त्या स्पर्धकासाठी शाकिंग आहे. पण खेळाचा नियम आहे आणि शेवटी एकच विजयी ठरणार आहे.

या आठवड्यात सोनाली पाटील (sonali patil) घऱातून बाहेर पडली आहे. आता बिग बॉसच्या घऱात विशाल निकम, विकास पाटील, मीनल शहा तसेच मीरा जगन्नाथ, जय दुधाणे व उत्कर्ष शिंदे ही मंडळी उरली आहे. आता बिग बॉसला त्याचे टॉप सिक्स मिळाले आहेत. आता शेवटच्या आठवड्यात खेळ अधिक रंजक होणार आहे. आता या ट्रॉफीवर कोण नाल कोरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सोनाली, विशाल, विकास आणि मीनल यांच्यातील घट्ट मैत्री या शोमध्ये पाहायला मिळाली. सोनाली तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत होती.

सोनाली पाटीलविषयी थोडसं...

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीजनची घरात प्रवेश करणार सोनाली पाटील शो ची पहिली स्पर्धक आहे. देवमाणूस या मालिकेत तिने वकील आर्याची भूमिका साकारली होती. सोनाली शॉर्ट व्हिडिओ साठी देखील खूप प्रसिध्द आहे.सोनाली टिकटॉक गर्ल म्हणून ओळखली जाते. ती कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडुली या गावची आहे.

वाचा-बिग बॉस मराठीच्या चावडवीर स्पेशल गेस्ट; स्पर्धक थिरकणार त्याच्या तालावर

सोनाली पाटीलने 2018 मधे 'जुळता जुळता जुळतयं की', घाडगे अँड सून, देव पावला, २०२० मधे 'देवमाणूस' आणि 'वैजू नं.१' यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सर्व मालिकेतील अभिनयाने सोनाली लोकप्रिय झाली. तिला लहानपणापासून च अभिनयाची आवड होती.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment