मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi 3: “माझा बाकीच्यांवर अजिबात विश्वास नाहीये” ; स्नेहा वाघ -जयशी नक्की कुणाबद्दल बोलत आहे? 

Bigg Boss Marathi 3: “माझा बाकीच्यांवर अजिबात विश्वास नाहीये” ; स्नेहा वाघ -जयशी नक्की कुणाबद्दल बोलत आहे? 

 स्नेहा बर्‍याचदा जयला सांगताना दिसते की, तिचा फक्त जयवरच विश्वास आहे बाकी कोणावर नाही. मग उत्कर्ष असो, वा बाकीचे त्यांच्या गटातील स्पर्धक असो. याचबद्दल जय  आणि स्नेहा बोलताना दिसणार आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 ऑक्टोबर : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये कधी कधी कोणावर विश्वास ठेवावा हे सदस्यांना कळतं नाही. कोण आपल्या बाजूने खरंच आहे आणि कोण असल्याचा आव आणत आहे हे हळूहळू काही काळ गेल्यानंतर कळून चुकत. स्नेहा बर्‍याचदा जयला सांगताना दिसते की, तिचा फक्त जयवरच विश्वास आहे बाकी कोणावर नाही. मग उत्कर्ष असो, वा बाकीचे त्यांच्या गटातील स्पर्धक असो. याचबद्दल जय  (jay dhudhane) आणि स्नेहा (sneha wagh)   बोलताना दिसणार आहेत. नक्की ते कशाबद्दल बोलत आहेत ? कोणाबद्दल चालू आहे विषय ? हे आजच्या भागामध्ये कळेलच.

स्नेहा जयशी आज चर्चा करताना दिसणार आहे. स्नेहाचे म्हणणे आहे, “तुमच्या चौघांमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तू त्यांच्याशी loyal रहा. तुम्ही तुमचे रहा. तुम्ही ते करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी तुला हे सांगते जसं मी आधी देखील सांगितले मला तुझ्यावर विश्वास आहे, पण मी बाकीच्यांवर विश्वास नाही ठेऊ शकतं.” जय म्हणाला, “काल जी गोष्ट झाली ना... Loyalty ची गोष्ट वेगळी आहे. मी आता उत्कर्षला देखील सांगितल. नको ठेऊस विश्वास बाकीच्यांवर.”

आता हे दोघे नक्की कशाबद्दल बोलत आहेत ? काय घडलं आहे ? ही आजच्या भागामध्ये कळेलच. तेव्हा बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री 9.30वा. आपल्या कलर्स मराठीवर.

वाचा :  'कारट्यांनो किती धुडगूस घालता रे...' Bigg Boss Marathi च्या घरात खास व्यक्तीची एन्ट्री

यासोबतच मागच्या काही दिवसांपासूनस्नेहा वाघ आणि जय दुधाणे अशी या दोन्ही स्पर्धकांची नावे आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांचे विषय, वाढत असेलेली जवळीक दोघेही प्रेमळ वाटेवर असल्याचे जाणवते. अद्याप स्पष्टपणे काहीही पुढे आले नसले तरी जाणवण्याइतक्या गोष्टी घडल्या आहेत.

बिग बॉस मराठी सीजन 3 च्या या आठवड्यात सुरेखा कुडची घराबाहेर झाल्या. आता या नॉमिनेशननंतर नव्या आठवड्यात नवं टास्क होणार आहे. इतर टास्कप्रमाणे हे टास्कही भन्नाट असणार आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरात एका खास व्यक्तीचं स्वागत केलं. बिग बॉसकडून खास व्यक्तीची घोषणा झाल्यानंतर सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये आले आणि त्यांना खास व्यक्ती घरात आल्याचं दिसलं. घरात दुसरं-तिसरं कोणी नाही, तर आजीचा आवाज घुमला. “कारट्यांनो किती धुडगूस घालता रे... हा संपूर्ण आठवडा माझी तुमच्यावर नजर असणार आहे. चला लागा तयारीला” असं म्हणत या खास टास्कला सुरूवात होणार आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment