• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • या आठवड्यात दादुस गायब होणार? Bigg Boss Marathi च्या घरात नवा ट्विस्ट

या आठवड्यात दादुस गायब होणार? Bigg Boss Marathi च्या घरात नवा ट्विस्ट

आदिश वैद्य काल घराबाहेर पडला. आजपासून पुन्हा नवा आठवडा सुरू होऊन नवं टास्क सुरू होईल. त्याआधी पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट घरात पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरातून दादुस गायब होणार असल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : बिग बॉस मराठी 3 च्या घरातून वाइल्ड कार्ड एन्ट्री आलेला आदिश वैद्य काल घराबाहेर पडला. आजपासून पुन्हा नवा आठवडा सुरू होऊन नवं टास्क सुरू होईल. त्याआधी पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट घरात पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरातून दादुस गायब होणार असल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय. दादुससोबत नेमकं काय होतं? ते कुठे गेले? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

  Shocking : आला आणि गेलासुद्धा; बिग बॉस मराठीच्या घरामधून आदिश वैद्य बाहेर

  A ग्रुप म्हणून समजले जाणारे जय, मीरा, उत्कर्ष आणि गायत्री हे एका मुद्द्यावरून अविष्कारबाबतही आजबोलताना दिसणार आहेत. आता आपण आविष्कार सारखं खेळूया, असं जय त्याच्या टीमला सांगताना दिसतो.
  बिग बॉसच्या घरात स्नेहा आणि जय अनेकदा मस्ती करताना दिसतात. ते घरातील अनेक विषयांवर चर्चाही करताना पाहायला मिळतं. आजच्या भागातही जय स्नेहाला सोनालीबद्दल काही सांगताना दिसणार आहे. सोनाली गेममध्ये, ग्रुपमध्ये कुठेही दिसत नसल्याचं जयचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे स्नेहा जयला मी एकटी जरी असले तरी खूप असल्याचं म्हणते. जय स्नेहाला तु मला तुझ्यासोबत काउंट कर, तुझ्या टीममध्ये मला घे असंही सांगताना दिसतोय.
  दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जावं लागणार आहे. या आठवड्यात मीनल, आदिश, विकास आणि दादूस नॉमिनेशनमध्ये होते. सुरुवातीला अक्षय वाघमारे, त्यानंतर सुरेखा कुडची आणि आता आदिश वैद्य घराबाहेर झाले आहेत. आता घरातील प्रत्येक सदस्य घरात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी, घराबाहेर न जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
  Published by:Karishma
  First published: