मुंबई, 24 सप्टेंबर 2021 ; सध्या सगळीकडे ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) सीजन तीनची चर्चा सुरू आहे. वादग्रस्त असणारा हा शो लोकप्रिय देखील तितकाच आहे. बिग बॉस म्हटले की गॉसिप आलेच. पहिल्या आठवड्यात एकमेंकांविरूद्ध जोराचे गॉसिप सुरू झाले आहे. यामध्ये मीरा जगन्नाथ आणि उत्कर्ष शिंदे आघाडीवर आहेत. घराच्या एका कोपऱ्यात हे दोघे किर्तनकार शिवलीला पाटील आणि सोनाली हिच्याविषयी दबक्या आवजात बोलताना दिसत आहे. यामध्ये उत्कर्ष शिवालीलाचे नाव घेत म्हणत आहे की, तिला कुणी माउली म्हटलं की तीला देवी झाल्यासारखं वाटते. सध्या शिवलीला यावरूनच घराबाहेर देखील ट्रोल होत आहे. बिग बॉस मराठीच्या घऱातील मंडळी देखील तिच्याविषयी बोलू (Bigg Boss Marathi Gossip ) लागले आहेत. मात्र यावरून फक्ता शिवलीला नाही तर मीरा तसेच उत्कर्ष देखील ट्रोल होत आहे.
मीरा आणि उत्कर्ष घऱातील स्पर्धकांविषयी चर्चा करत आहे. त्यावेळी तो शिवलीलाचे पाटीलचे नाव घेतो. , तिला कुणी माउली म्हटलं की तीला देवी झाल्यासारखं वाटते.. आणि सगळी तसच करत असल्याचे देखील तो म्हणतो. विशाल देखील हेच करत आहे असे तो म्हणतो. मीनल देखील तोंडातल्या तोंडात काही तरी म्हणते ते नीटसे कळत नाही. यावरून मीराला एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, Big boss team एक विनंती आहे स्पर्धकांना थोडे मोठ्याने बोलायला सांगा कृपया सांगा काही नीट ऐकू येत नाही . तर दुसरा म्हणतो मीरा म्हणजे चुगली भूत. ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला करते.
Bigg Boss Marathi 3 मध्ये अरुण गवळीच्या जावयाची चर्चा ; काय आहे दादा कोंडकेंशी कनेक्शन ?
सोनाली, मीनल आणि शिवलीला पाटील या तिघींचे घऱात सुर जुळले आहेत. यावरून देखील उत्कर्ष म्हणतो की, या दोघी आजीबाई म्हणजे सोनाली व मीनल शिवलीला समजवताता व ती त्यांचे ऐकते. यावर मीरा देखील म्हणते जाऊदे. . उत्कर्षने मीराबद्दल जे वक्तव्या केले आहे त्यावर एका नेटकऱ्याने उत्कर्षचे कान टोचले आहेत. उत्कर्ष काय म्हणाला तिला माउली म्हण तिला देवासारखे वाटते हे वाक्य खटाकले नाही काय कुणाला..असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. एकूण काय घरात आणि घराबाहेर देखीस किर्तनकार शिवलीला पाटीलच्या नावचीच चर्चा आहे.
तसेच आता कॅप्टनशिपसाठी घरात चांगलीच चुरस रंगणार आहे. ही चुरस डॉ. उत्कर्ष शिंदे आणि मीरा जगन्नाथ यांच्यात होत आहे. हा टास्क खेळत असताना जय दुधाणे आणि मीरा यांच्यात जोराचे भांडण झाले. त्यामुळे हा टास्क पूर्ण झाला की नाही, या टास्कमध्ये कोण जिंकले आणि घरात पहिला कॅप्टन होण्याचा मान कुणाला मिळाला याची उत्सुकता देखील लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi