मुंबई, 18 ऑक्टोबर : बिग बॉसच्या घरातील सदस्य एकेमकांशी दुसर्या ग्रुपबद्दल बोलताना दिसतात. काही वेळेस ते योजना अखताना दिसतात तर काही वेळेस कसे दुसर्या ग्रुपला किंवा टीमला मात देता येईल याबद्दल चर्चा करताना दिसतात. तर कधी, कधी दुसर्या सदस्याशी आपलं काय बोलणं झालं हे सांगताना दिसतात. आज जय स्नेहाशी त्याचं काय बोलणं झालं याबद्दल बोलताना दिसणार आहे. या तिघांना म्हणजे जय (jay dudhane),मीरा (Mira Jagannath) आणि उत्कर्षला (utkarsh shinde )नक्की कोणाबद्दल बोलायचं आहे ? स्नेहाने कोणावर विश्वास ठेवायला नको ? घरामध्ये कोण स्नेहाचा फायदा करून घेत आहे? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.
जय हा उत्कर्ष आणि मीराशी बोलताना म्हणाला, “मी स्नेहाला क्लियर सांगितलं कोणीही तुझ्यासाठी उतरल नसतं. आणि आतासुध्दा तुला भरपूर लोकं आश्वासन देतील, मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन, मी तुझ्यासोबतच आहे पहिल्यापासून वैगरे. जेव्हा रविवार येतो, तशी सिचुएशन येते तेव्हा काय होतं मला बघायचं आहे. कारण माझ्यासमोर तर तो मुलगा पडला. जे त्याने सुरेखाताईंसोबत केलं. तो दाखवतो एक आणि करतो एक. उत्कर्षचं म्हणण पडलं तो त्याच्याच माणसाशी तसं करतो. दुसर्यांशी केलं तर ठीक आहे पण सुरेखाताई त्यांची होती ना?
View this post on Instagram
जय म्हणाला, “मी तिला सांगितले स्वंतत्र खेळ, मीरा सोबत खेळ, माझ्यासोबत खेळ नाही सांगत मी. पण मी तिला हिंट दिली तिकडे जाऊ नको त्या मुलाकडे. मीरा म्हणाली, “तो तिला शेरनी म्हणून चिढवतो हे तिला कळायला हवं”.
हे तिघं विशाल निकमबद्दल (Vishal Nikam )तर बोलत नसतील ना? जाणून घेण्यासाठी बघत रहा बघा बिग बॉस मराठी सिजन तिसरा.
बिग बॉस मराठी सीजन 3 च्या या आठवड्यात सुरेखा कुडची घराबाहेर झाल्या. आता या नॉमिनेशननंतर नव्या आठवड्यात नवं टास्क होणार आहे. इतर टास्कप्रमाणे हे टास्कही भन्नाट असणार आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरात एका खास व्यक्तीचं स्वागत केलं. बिग बॉसकडून खास व्यक्तीची घोषणा झाल्यानंतर सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये आले आणि त्यांना खास व्यक्ती घरात आल्याचं दिसलं. घरात दुसरं-तिसरं कोणी नाही, तर आजीचा आवाज घुमला. “कारट्यांनो किती धुडगूस घालता रे... हा संपूर्ण आठवडा माझी तुमच्यावर नजर असणार आहे. चला लागा तयारीला” असं म्हणत या खास टास्कला सुरूवात होणार आहे.
त्यामुळे आता या नवीन टास्कमुळे व आजीच्या येण्यामुळे घरात काही बदलणार का, याचा घरातील सदस्यांच्या खेळावर काय परिणाम होणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. दिवसेंदिवस खेळ रंगत चालला आहे. या आठवड्यात सुरेखा कुडची घरातून बाहेर पडल्या आहेत तर आता येणाऱ्या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार कोण सेफ होणार याकडेही सर्वांचे लक्ष लगाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.