• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi 3 First Elimination : घरामधून 'हा' स्पर्धक बाहेर...; घरातल्यांना अश्रू अनावर

Bigg Boss Marathi 3 First Elimination : घरामधून 'हा' स्पर्धक बाहेर...; घरातल्यांना अश्रू अनावर

या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते.

 • Share this:
  मुंबई, 10 ऑक्टोबर : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 3  (Bigg Boss Marathi 3)हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत...ईथे अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत... बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते.शेवटी सुरेखा कुडची आणि अक्षय वाघमारे हे डेंजर झोनमध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला (Akshay Waghmare ) बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. घरातील प्रत्येक सदस्यांना अश्रू अनावर झाले.तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार ?  हे बघणे रंजक असणार आहे.  या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले
  ,या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले
  वाचा : Bigg Boss Marathi 3 च्या घरात नव्या सदस्याची धम्माकेदार एंट्री ; कोणत्या ग्रुपचा होणार सदस्य? महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर अक्षयने घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले, तेंव्हा तो म्हणाला, “मी सर्वात जास्त जय, विशाल आणि उत्कर्षला मिस करेन. त्यानंतर विकास आणि तृप्तीताईंची आठवण येईल. त्या घरामध्ये रहाण खूप कठीण आहे. मी टास्क खेळलो तेव्हा पूर्ण जीव ओतून खेळालो”. बिग बॉस मराठीच्या सीजन तिसऱ्यामधून घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला
  बिग बॉस मराठीच्या सीजन तिसऱ्यामधून घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला
  बिग बॉस मराठीच्या सीजन तिसऱ्यामधून घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सीजन तिसरा सोम ते रवि रात्री 9.30 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर. वाचा : उठा उठा सकाळ झाली...; सई ताम्हणकरच्या Sunday Special फोटोशूटवर चाहत्याची भन्नाट कमेंट अक्षय वाघमारे कोण आहे ? अक्षय वाघमारे याचा जन्म 1988मध्ये मुंबईत झाला. मुंबईतच त्याने शिक्षण पूर्ण केले. इतकेच नाही तर त्याने मॉडेल कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्याने याच विषयामध्ये पुण्यातून मास्टर्सही केले आहे.अक्षय हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. अक्षयने मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली. मॉडेलिंगबरोबरच त्याला फिटनेसची देखील आवड आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रीय असलेला अक्षय त्याच्या फिटनेसेचे व्हिडिओ सातत्याने शेअर करत असतो. मॉडेलिंग, फिटनेस फ्रिक असलेल्या अक्षयला अभिनयासाठी विचारणा झाली. तेव्हा काही तरी वेगळे करायचे या उद्देशाने त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि इथे तो रमला. 2019 मध्ये अक्षय वाघमारेला 'हॉटेस्ट मॅन ऑफ द मराठी टीव्ही' हा किताब मिळाला आहे.
  अक्षय ज्येष्ठ विनोदी अभिनेते दादा कोंडके यांचा नातू आहे. अक्षय वाघमारेने आतापर्यंत फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या मराठी सिनेमांत काम केले आहे. त्याशिवाय 'ती फुलराणी' या मालिकेतही तो दिसला होता.अक्षय राजकीय नेते अरुण गवळीचा जावई आहे. अक्षयने अरुण गवळीची मुलगी योगिताशी मे 2020 लग्न केले. हे लग्न गवळीचा बालेकिल्ला असलेल्या दगडी चाळीमध्ये झाले होते. या लग्नाची खूप चर्चाही झाली होती. या लग्नाला फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते. 7 मे 2021 रोजी अक्षय आणि योगिताला मुलगी झाली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: