मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss Marathi 3 : अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये जोराचा वाद , VIDEO आला समोर

Bigg Boss Marathi 3 : अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये जोराचा वाद , VIDEO आला समोर

अक्षयच्या आंगावर पाणी टाकल्याने विशाल (Bigg Boss Marathi 3)  आणि अक्षयमध्ये बाचाबाची होते.  ज्यामध्ये अक्षय विशालला बोलतो,  “मी दुसर्‍यांच्या डोक्याने नाही खेळत”. आता हा वाद कुठे थांबणार ? पुढे काय होणार ? या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या भागात पाहण्यास मिळणार आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई ३० सप्टेंबर, २०२१ ;  बिग बॉस    (Bigg Boss Marathi 3) मराठीच्या घरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरु आहे. टीम A आणि टीम B मध्ये शाब्दिक युध्द चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत (Bigg Boss Marathi 3 Latest Update)घेताना दिसत आहेत. आज मोटर बाईक बसायला येणार आहेत जय आणि गायत्री. आता विरोधी टीम जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यात शंका नाही. आता हा टास्क आज कसा रंगणार ? जय आणि गायत्री किती वेळ मोटार बाईक बसू  शकतील ? विकास, विशाल, मीनल, आविष्कार, सोनाली आणि सुरेखाताई त्यांना बाईकवरुन उठवण्यात यशस्वी होतील का ?, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबणाचे पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये ही टीम अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयत्न करणार हे  पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या टास्क दरम्यान अक्षय आणि विशालमध्ये वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसत आहे. अक्षयच्या अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये बाचाबाची होते.  ज्यामध्ये अक्षय विशालला बोलतो,  “मी दुसर्‍यांच्या डोक्याने नाही खेळत”. आता हा वाद कुठे थांबणार ? पुढे काय होणार ? या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या भागात पाहण्यास मिळणार आहेत.

वाचा :हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप; आलिया भटविरोधात तक्रार दाखल

बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन पहिल्या दिवसापासूनच विविध वादांमुळे चर्चेत आला आहे दररोज घरात कोणत्या कोणत्या कारणावरून स्पर्धकांचे खटके उडत आहेत. यात भर म्हणून की काय  बिग बॉसने स्पर्धकांना नुकताच एक टास्क दिलाय. या टास्कमुळे आणखी वाद वाढताना दिसतोय. हल्लाबोल या टास्कसाठी स्पर्धकांची दोन गटात विभागणी केली आहे. हा टास्क जिंकण्यासाठी स्पर्धक वाटेल ते करत आहे.

बिग बॉस मरठीच्या घरात शिवलीला पाटील यांची प्रकृती अचानक ढासळली.  बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहणार असल्याचे देखील बिग बॉसने सांगितले आहे. त्यामुळे या घरात कधी काय  होईल याचा अंदाज कोणालच लावता येत नाही. त्यामुळे हा टास्क कोण जिंकणार हे कोणालाच सांगता येत नाही.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Tv serial, Tv shows